Sudan Crisis: सुदानमध्ये तीन दिवसांपासून लष्करी दलांमध्ये भीषण संघर्ष; तब्बल 180 हून अधिक लोकांचा मृत्यू, 1,800 जखमी

दोन्ही गटांचे सुदानमध्ये सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण कायमस्वरूपी काहीही होत नाही. सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी सुदानच्या नियंत्रणासाठी देशाचे सैन्य आणि शक्तिशाली निमलष्करी दल यांच्यात संघर्ष सुरू राहिला.

Sudan Crisis (संग्रहित संपादित प्रतिमा)

सुदानमध्ये (Sudan) गेल्या तीन दिवसांपासून हिंसक संघर्ष सुरू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 180 जणांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत 1800 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. भारतातील अनेक लोक सुदानमध्ये अडकले आहेत. दुसरीकडे, युरोपियन युनियनच्या राजदूतावरही हल्ला झाला आहे. जगभरातील देश आणि संघटनांकडून हा हिंसाचार थांबवण्याचे आवाहन केले जात आहे, परंतु अद्याप कोणतेही यश मिळालेले नाही.

सुदानची राजधानी खार्तूम आणि त्याच्या लगतच्या ओमदारमान शहरात भीषण संघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांकडून गोळीबार, बॉम्बफेक आणि हवाई हल्ले केले जात आहेत. या हिंसाचारात सर्वसामान्यांचे बळी जात आहेत. वीज आणि पाण्याचीही टंचाई निर्माण झाली आहे, लोकांना घराबाहेर पडता येत नाही. हे सर्व का होत आहे आणि या लढ्यात कोणाचा हात आहे, हे सविस्तर जाणून घेऊया.

सुदानमध्ये सध्या सुरू असलेला संघर्ष देशाचे लष्कर आणि निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्स (RSF) यांच्यात आहे. हा संघर्ष देशात सत्तापालट झाली होती तेव्हापासून म्हणजेच ऑक्टोबर 2021 पासून सुरू आहे. तेव्हापासून देशाचे लष्कर आणि आरएसएफ मिळून सुदान चालवत आहेत. हे दोघेही सुदानचे सरकार चालवणाऱ्या कौन्सिलचा भाग आहेत. या परिषदेचे प्रमुख अब्देल फताह अल बुरहान हे सुदान लष्कराचे जनरल आहेत. आरएसएफचे प्रमुख जनरल मोहम्मद हमदान डागलो हे या परिषदेचे उपाध्यक्ष आहेत.

या दोघांमधील परस्पर कुरघोडी आणि परिषदेच्या काही निर्णयांमुळे हा संघर्ष होत आहे. वास्तविक, या परिषदेला सुदानच्या सैन्यात आरएसएफचा समावेश करायचा आहे. हे काम 10 वर्षांसाठी पुढे ढकलण्यात यावे, असे आरएसएफचे म्हणणे आहे. दुसरीकडे, सुदानी सैन्याला दोन वर्षांत आरएसएफचा भाग बनवायचा आहे. जेव्हा या मुद्द्यावरून दोघांमध्ये तणाव वाढला तेव्हा आरएसएफने मेरोवे येथील लष्करी स्टेशनजवळ आपले सैनिक तैनात केले. या संघर्षामागे लष्कराचे जनरल अब्देल फताह अल-बुरहान आणि आरएसएफचे प्रमुख जनरल मोहम्मद हमदान यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आहेत. (हेही वाचा: Cows Die in Explosion: टेक्सास फार्ममध्ये स्फोटानंतर भीषण आग; 18 हजार गायींचा जळून मृत्यू)

यावरून दोघांमधील संघर्षाने आता हिंसक रूप धारण केले आहे. दोन्ही गटांचे सुदानमध्ये सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण कायमस्वरूपी काहीही होत नाही. सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी सुदानच्या नियंत्रणासाठी देशाचे सैन्य आणि शक्तिशाली निमलष्करी दल यांच्यात संघर्ष सुरू राहिला. 2019 मध्येही बंडखोरी झाली आहे. येथे लष्कर खूप प्रभावशाली आहे. त्यामुळेच पुन्हा पुन्हा सत्तापालट होत आहे. यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले की ते अरब लीग, आफ्रिकन युनियन आणि प्रदेशातील नेत्यांशी बोलत आहेत आणि त्यांना संघर्ष संपवण्याचे आवाहन करत आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now