Pakistan मध्ये टेलिव्हिजन मालिका 'संस्कारी' दाखवा, इम्रान खान यांचे आदेश

पाकिस्तानमध्ये प्रसारमाध्यमांवर दाखवण्यात येणाऱ्या मालिका आणि कार्यक्रमांना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून कडक आदेश देण्यात आले आहेत.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: File Image)

पाकिस्तानमध्ये प्रसारमाध्यमांवर दाखवण्यात येणाऱ्या मालिका आणि कार्यक्रमांना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून कडक आदेश देण्यात आले आहेत. कारण सध्या टीव्ही शोच्या माध्यमातून बहुधा त्यावर लैंगिक अत्याचार, मारहाण, हत्या असे संस्कृतीच्या विरुद्ध दिशेचे कार्यक्रम दाखविले जातात. त्यामुळे इम्रान खान यांनी अशा टीव्ही शोसाठी गाईडलाईन दिली आहे.

इम्रान खान यांच्या सरकारने पाकिस्तानमध्ये टीव्ही चॅनलवरील मालिकांमध्ये सक्तीने कोणत्याही पद्धतीचे आक्षेपार्ह चित्रिकरणावर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच पीईएमआरए (PEMRA) यांनी टीव्हीवर दाखवण्यात येणारे बेड सिन, इंटिमेट सिन दाखवण्यास विरोध केला आहे. यामुळे बहुतांश पाकिस्तान मधील महिला अशा पद्धतीच्या टीव्ही मालिका पाहण्यात गुंतलेल्या असतात. त्यामुळे बोल्ड सिन टीव्ही शोच्या माध्यमातून दाखवल्यास त्याचा महिलांवरच नाही तर सर्वांवर वाईट परिणाम होत असल्याचे पीईएमआरएने सांगितले आहे.

यामुळे पाकिस्तानात टीव्हीवर दाखवण्यात येणारे कार्यक्रम संस्कारी दाखवा असे आदेश इम्रान खान यांनी प्रसारमाध्यांच्या चॅनल्सला दिले आहे.