धक्कादायक: सावत्र आईचा अल्पवयीन मुलावर दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार; कोर्टाने सुनावली 5 वर्षांची शिक्षा

ब्रिटनमधील (Britain) कॅसल हिल (Castle Hill) येथे आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारे हे प्रकरण समोर आले आहे. एका सावत्र आईने तिच्या 16 वर्षाच्या मुलावर 2 वर्षे लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केले आहेत

धक्कादायक: सावत्र आईचा अल्पवयीन मुलावर दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार; कोर्टाने सुनावली 5 वर्षांची शिक्षा
Say No to Sexual Assault. (Photo Credits: File Image)

आई, मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी वेगवेगळी गिफ्ट्स देत असते. त्यात जर मुलगा वयात येणारा असेल, तर अशा मुलांना भेटवस्तू देण्यासाठी अनेक पर्याय आहेत. मात्र एका आईने मुलाच्या वाढदिवसादिवशी त्याला स्वतःच्या वासनेचा बळी केला. ब्रिटनमधील (Britain) कॅसल हिल (Castle Hill) येथे आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारे हे प्रकरण समोर आले आहे. एका सावत्र आईने तिच्या 16 वर्षाच्या मुलावर 2 वर्षे लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केले आहेत. जेव्हा हे प्रकरण कोर्टात पोहोचले तेव्हा, तिने हे सर्व मुलाच्या सहमतीने झाल्याचे सांगितले. मात्र कोर्टाला यात तथ्य वाटले नाही व या महिलेला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

डेली स्टारच्या वृत्तानुसार ही 38 वर्षीय महिला गेल्या 2 वर्षांपासून, आपल्या सावत्र मुलासोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवत होती. जेव्हा महिलेच्या नवऱ्याला या गोष्टीचा संशय आला तेव्हा त्याने खोलीत ध्वनी रेकॉर्डर लपविला. त्यानंतर ही बाब संपूर्ण उघडकीस आली. या महिलेचे संभाषण या रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले होते, यावरून पतीला या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली. रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर या महिलेचा नवरा संतापला व त्याने या गोष्टीचा जाब विचारला. त्यावेळी या महिलेने हे सर्व चेष्टेने चालले असल्याचे सांगितले.

नंतर वडिलांनी मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली. मुलाची वकिल लॉरा पिट्ट्मन यांनी कोर्टाला सांगितले की, लैंगिक संबंधाच्या संमतीचे वय 16 वर्षे आहे, मात्र या प्रकरणात सावत्र आईने हे कृत्य केल्याने हा कायदेशीर गुन्हा मानला जाईल. ही महिला सेक्ससाठी सतत मुलाला ब्लॅकमेलदेखील करत होती. (हेही वाचा: वडिलांकडून 9 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार; आईने केली पोलिसात तक्रार दाखल)

मुलाने कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तो केवळ 15 वर्षांचा होता तेव्हापासून त्याची सावत्र आई त्याच्याशी फ्लर्ट करत होती. त्याच्या 16 व्या वाढदिवशी आईने मुलासोबत पहिल्यांदा लैंगिक संबंध ठेवले. नंतर आईने त्याला रोज लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. या महिलेले आपण गरोदर असल्याचे सांगून मुलाला ब्लॅकमेलही केले. चौकशीदरम्यान,  पोलिसांना असे आढळले आहे की, ही महिला गंभीर मानसिक आजारांनी ग्रस्त आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 13, 2020 08:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).