Molested Schoolgirl In Bangladesh: शाळकरी मुलीचा पाठलाग करून विनयभंग; भयावह घटनेचा Video व्हायरल, आरोपीला अटक
Molested Schoolgirl In Bangladesh PC TWITTER

Molested Schoolgirl In Bangladesh: एक व्यक्ती शाळकरी मुलीचा पाठलाग करत विनयंभग केल्याचा धक्कादायक घटना समोर येत आहे. मुलीचा पाठलाग केल्यानंतर तीच्यावर हल्ला करत विनयभंंग केल्याचे समोर आले आहे. ही घटना संपुर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही संतापजनक घटना बांगलादेशातील असल्याचे समजले आहे. सीसीटीव्ही फुटेजवरील टाईम स्टॅम्पनुसार ही घटना (17) मार्च रोजी सकाळी 8.41 वाजता घडली. या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आले आहे. हेही वाचा- पुणे शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा,

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, बांगलादेशातील एका निवासी भागात ही घटना घडली आहे. एक शाळकरी मुलगी घरातून निघाली असताना एका निर्जन रस्त्यातून जात असताना एकटी चालताना दिसत आहे. दरम्यान एक माणून तिच्या मागे पाठलाग करताना दिसतो. पाठलाग करता करता लगेच पीडित मुलीला पकडतो तीच्यावर हल्ला करतो. ती बराच विरोध करण्याचा प्रयत्न करते, परंतु जबरदस्तीने तीचा विनयभंग करतो. दरम्यान  पीडित मुलगी खुप घाबरते आणि आरडाओरड करते. पीडित मुलगी आरडाओरड केल्यानंतर  ही संपुर्ण भयावह घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी आरोपीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे. सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. या धक्कादायक घटनेमुळे बांगलादेशात संतापाची लाट उसळली आहे.