South Korean Murder Case: प्रेयसीची हत्या, मृतदेह सिंमेंटमध्ये पुरला; तब्बल 16 वर्षांनी फुटले बिंग, आरोपीस अटक

आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर मैत्रिणीची हत्या आणि मृतदेह वर्षानुवर्षे सिमेंटमध्ये लपविल्याचा आरोप आहे.

Representational Image (Photo Credits: File Image)

South Korea Cold Case: गुन्हेगार कितीही हुशार असला तरी, तो आपल्या गुन्ह्याचा काही ना काही पुरावा मागे सोडतोच. तो पुरावा एकदा का पोलिसांना मिळाला, त्यांनी मनात आनले तर गुन्हेगाराला ते कोठूनही शोधून काढू शकतात हे निश्चित. असाच काहीसा प्रकार दक्षिण कोरियामध्ये घडला आहे. दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी (South Korean Police) एका 50 वर्षीय व्यक्तीस अटक केली आहे. ज्यामुळे 2008 पासून रखडलेले एक जुन्या हत्या प्रकरणाचा गुंता सुटला आहे. आरोप आहे की, पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीने लिव्ह-इन प्रेयसीची 16 वर्षांपूर्वीच हत्या करुन तिचा मृतदेह घराच्या बाल्कनीमध्ये सिमेंटमध्ये लपवून ठेवला होता.

पोलिसांनी आरोपीचे नाव ठेवले 'A'

पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाली होती. गुन्हाही दाखल होता. मात्र, गुन्हेगाराचे नाव माहिती नव्हते. त्यामुळे पोलिसांनी गुन्हेगाराचे नाव 'ए' असे ठेवले होते. पोलिसांनी केवळ 'ए' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संशयिताला 19 सप्टेंबर रोजी यांगसन येथे अटक केली. हे प्रकरण बराच काळ प्रलंबीत होते. मात्र, केवळ योगायोग म्हणूनच असावे कदाचित, या महिन्यात प्रकरणाला पुन्हा एकदा वाचा फुटली आणि आरोपीला पकडण्यात यश आले. जाणून घ्या नेमके काय घडले? (हेही वाचा, Shocking: तब्बल 18 तासांच्या कामानंतर बाईकवर डुलकी घेताना डिलिव्हरी एजंटचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ)

बाल्कनी साफ करताना आढळला सांगाडा

त्याचे झाले असे, घराच्या छतावरील बाल्कनीमध्ये पाणी गळत होते. त्यामुळे त्याची डागडुजी आणि साफसफाई सुरु करणयात आली होती. दरम्यान, तिथे काम करणाऱ्या एका बांधकाम कामगारास काँक्रीट आणि विटांनी वेढलेल्या सुटकेसमध्ये मानवी सांगाडा आढळून आला. या सुटकेसवर केवळ 'बी' असा उल्लेख होता. ज्यामध्ये एका व्यक्तीचे अवशे अंशत: जतन करुन ठेवल्याचे त्याच्या लक्षात आले.

या प्रकरणात प्रेयसीच्या हत्येसाठी हा प्रियकरच जबाबदार असल्याचा संशय पोलिसांना आगोदरच होता. पण, सबळ पुरावा नसल्याने पोलिसांना खटला चालवता आला नाही. सबब 2011 मध्ये, पोलिसांनी प्रियकरावर संशय घेतला होता परंतु खटला दाखल झाला नाही. कोणतेही लक्षणीय धागेदोरे न देता, हे प्रकरण एका दशकापेक्षा जास्त काळ अनुत्तरित राहिले. दरम्यान, आता सांगाडाच सापडल्याने पोलीस पुन्हा सक्रीय झाले. न्यायवैद्यक तंत्रज्ञानातील प्रगती आणि नव्याने केलेल्या तपासामुळे पोलिसांनी प्रियकराची पुन्हा मुलाखत घेतली, ज्याने अखेरीस हत्येची कबुली दिली. ऑक्टोबर 2008 मध्ये झालेल्या वादादरम्यान त्याने आपल्या प्रेयसीला अनकुचीदार वस्तूने मारून तिची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये ठेवला, जो त्याने सिमेंट आणि विटांखाली त्यांच्या बाल्कनीवर पुरला.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, प्रियकराने पीडितेचे कुटुंब आणि घरमालक या दोघांचीही फसवणूक केली आणि दावा केला की ती भांडणानंतर निघून गेली आहे. तो 2017 पर्यंत अपार्टमेंटमध्ये राहिला. दरम्यान, तो अंमली पदार्थांच्या आरोपाखाली तुरुंगात गेला आणि त्याने घर सोडले. दरम्यान, मृतदेहाबद्दल अनभिज्ञ असलेल्या घरमालकाने त्या सदनिकेचा वापर साठवणुकीची जागा म्हणून केला, ज्यामुळे हा भीषण गुन्हा वर्षानुवर्षे उघडकीस आला नाही. पण बाल्कनीत गळती सुरु झाली आणि प्रकरण चव्हाट्यावर आले.

न्यायवैद्यकीय चाचणीत मृत्यूच्या कारणाची पुष्टी केली

वैद्यकीय आणि न्यायवैद्यकीय चाचणीत मृतदेहाची ओळख पटली. पण त्याच्या कारणांचीही पुष्टी झाली. शवविच्छेदन अहवालात असे दिसून आले की, डोक्यावर अनकुचीदार वस्तूने आघात झाल्याने पीडितेचा मृत्यू झाला. अवशेष सापडल्यानंतर सुमारे एक महिन्याच्या तपासानंतर संशयिताला अटक करण्यात आली आहे. मृतदेह लपवण्याच्या मर्यादेच्या कायद्याची मुदत संपली असली तरी, प्रियकरावर आता अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांसह इतर आरोप आहेत. तपास पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने सरकारी वकील या प्रकरणाचा आढावा घेत आहेत आणि संशयितावर हत्येसाठी अतिरिक्त आरोप होऊ शकतात.