Sri Lanka Economic Crisis: PM मोदी बनणार श्रीलंकेचे 'संकटमोचक'! आतापर्यंत 19 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत, 40 हजार टन डिझेल कोलंबोत पोहोचले
इंधन, स्वयंपाकाचा गॅस, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पुरवठा आणि लांबलचक वीजकपात यामुळे श्रीलंकेत अशांतता पसरली आहे.
Sri Lanka Economic Crisis: आर्थिक संकटातून जात असलेल्या श्रीलंकेसाठी भारत एक समस्यानिवारक म्हणून पुढे आला आहे. श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त गोपाल बागले यांनी सांगितले की, भारताने या वर्षी जानेवारीपासून श्रीलंकेला 250 कोटी डॉलरची म्हणजेचं सुमारे 19 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत पाठवली आहे. ते म्हणाले की, भारत श्रीलंकेला मदत करण्यास तयार आहे.
आर्थिक आणि ऊर्जा संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शनिवारीच भारताने 40 हजार मेट्रिक टन डिझेलची खेप श्रीलंकेला पाठवली. भारताकडून अशी ही चौथी मदत आहे. गोपाल बागले म्हणाले की, या चार खेपांमध्ये दीड लाख मेट्रिक टनांहून अधिक जेट इंधन, डिझेल आणि पेट्रोल श्रीलंकेत पोहोचले आहे. (हेही वाचा - Nawaz Sharif Attacked In London: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर लंडनमध्ये हल्ला; मुलगी मरियमने केली इम्रान खानला अटक करण्याची मागणी)
भारताने श्रीलंकेला 1 अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्याचे मान्य केले आहे. यामुळे श्रीलंकेला जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भरून काढण्यास मदत होणार आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे. अशा परिस्थितीत भारतातून तांदळाची खेप श्रीलंकेत पोहोचल्यानंतर तिथल्या तांदळाच्या किमती खाली येण्याची अपेक्षा आहे, जे गेल्या वर्षभरात दुपटीने वाढले आहे. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी श्रीलंका आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी (IMF) चर्चा करत आहे.
श्रीलंकेत देशभर संचारबंदी लागू -
दरम्यान, सार्वजनिक सुरक्षेच्या नावाखाली देशात आणीबाणी जाहीर करणे ही मानवी हक्कांच्या उल्लंघनाची सबब ठरू नये, असा इशारा लंडनच्या मूलभूत हक्कांवर देखरेख ठेवणाऱ्या अॅम्नेस्टी वॉचडॉगने श्रीलंका सरकारला दिला. श्रीलंकेत देशव्यापी कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे, जो शनिवारी सकाळी 6 ते सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत असेल. श्रीलंकेत विजेच्या भीषण संकटामुळे महागाई शिगेला पोहोचली आहे.
श्रीलंका आर्थिक संकटात -
श्रीलंका सध्या इतिहासातील सर्वात भीषण आर्थिक संकटातून जात आहे. इंधन, स्वयंपाकाचा गॅस, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पुरवठा आणि लांबलचक वीजकपात यामुळे श्रीलंकेत अशांतता पसरली आहे.