Nigeria: जहाजाच्या खालच्या भागाच्या Rudder मध्ये बसून 3 जणांनी विनातिकीट 11 दिवसांत केला 3200 किलोमीटरचा धोकादायक प्रवास

11 दिवसांत 3200 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर ते स्पॅनिश सीमेत दाखल झाले.

Ship प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Wikipedia)

Nigeria: नायजेरियामधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. तीन जणांनी जहाजाच्या (Ship) खालच्या भागाच्या 'रडर' (Rudder) मध्ये बसून 11 दिवसांत 3200 किलोमीटरचा धोकादायक प्रवास केला. ज्या जहाजावर हे तिघेजण बसले होते, त्या जहाजाच्या 'रुडर'पासून काही इंच अंतरावर समुद्राच्या लाटा होत्या. या तिन्ही तिकीट नसलेल्या प्रवाशांनी नायजेरिया (Nigeria) ते कॅनरी बेटावर जाण्याचा निर्णय घेतला. अलिथिनी II या तेल टँकर जहाजाच्या 'रडर'वर बसून तीन जण प्रवास करत होते. रुडर कोणत्याही जहाजाला दिशा देण्यासाठी उपयुक्त आहे. हा भाग जहाजाच्या खालच्या बाजूला असतो आणि तो पाण्याला स्पर्श करतो. स्पॅनिश तटरक्षक दलाने सोमवारी या तिन्ही तिकीट नसलेल्या लोकांचा फोटो शेअर केला. यामध्ये तिघेही 'रडर'वर बसलेले दिसत आहेत. त्याचवेळी या लोकांचे पाय समुद्राच्या लाटांपासून काही इंच अंतरावर दिसत आहेत.

अधिका-यांनी सांगितले की, या धोकादायक आणि लांबच्या प्रवासामुळे तिघांनाही डिहायड्रेशन आणि हायपोथर्मियाचा त्रास झाला. या संदर्भात स्थलांतर सल्लागार सेमा संताना यांनी सांगितले की, असे काही पहिल्यांदाचं घडलेले नाही. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांचे नशीब नेहमीच सोबत नसते. (हेही वाचा -Covid Scare on Cordelia Crusie Ship: मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझ शिपवर तब्बल 66 प्रवाशांना कोरोनाची लागण)

दरम्यान, हे तीन लोक ज्या जहाजात येत होते ते जहाज 17 नोव्हेंबरला नायजेरियातील लागोस शहरातून निघाले होते. 11 दिवसांत 3200 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर ते स्पॅनिश सीमेत दाखल झाले. 2020 मध्ये, 14 वर्षांचा नायजेरियन मुलगा देखील 15 दिवसांचा प्रवास करून अशाच प्रकारे लागोसहून स्पेनला आला होता. 15 दिवसांच्या प्रवासात तो समुद्राचे पाणी प्यायला आणि रडरच्या वरच्या भागावर झोपला. 2020 मध्ये रडरच्या मागे खोलीत लपून 10 दिवसांच्या प्रवासानंतर 4 लोक स्पेनला पोहोचले होते. (हेही वाचा - Indian Navy: नौदलाची ताकद वाढणार, पहिल्या स्वदेशी जहाजविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी)

या वर्षी 11,600 लोकांनी सागरी मार्गाने बोटीने प्रवास करून देशात प्रवेश केल्याचा अहवाल स्पेनच्या गृह मंत्रालयाने दिला आहे. यामध्ये हजारो आफ्रिकन निर्वासितांचा समावेश आहे.