America Firing: कॅलिफोर्नियामध्ये लूनर न्यू ईयर पार्टीदरम्यान गोळीबार; 10 ठार, 16 हून अधिक जखमी

यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला.

Firing | (Photo Credits: Pixabay)

America Firing: अमेरिकेतील कॅलिफोर्निया (California) मध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. मॉन्टेरी पार्कमध्ये चायनीज लूनर न्यू इयर (Chinese Lunar New Year)सेलिब्रेशन सुरू असताना एका व्यक्तीने अचानकपणे अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. तर या घटनेत 16 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिसराची नाकेबंदी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लॉस एंजेलिसजवळील मॉन्टेरी पार्कजवळ मोठा गोळीबार झाला. लूनर न्यू इयर साजरे करण्यासाठी येथे हजारो लोक जमले होते. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास अचानक गोळीबार सुरू झाला. या गोळीबारात 26 गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मॉन्टेरी पार्क हे लॉस एंजेलिस काउंटीमधील एक शहर असून ते लॉस एंजेलिसच्या डाउनटाउनपासून अंदाजे 11 किलोमीटर अंतरावर आहे. (हेही वाचा - US Air Strike: Somalia मध्ये अमेरिकेचा एअर स्ट्राईक; Al-Shabab दहशतवादी संघटनेचे 30 जण ठार)

यापूर्वी फ्लोरिडातील फोर्ट पियर्समध्ये गोळीबाराची घटना घडली होती. ज्यात किमान 8 जण जखमी झाले आहेत. हा कार्यक्रम फोर्ट पियर्स येथील इलस एलिस पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. कार्यक्रमात लाइव्ह म्युझिक, लहान मुलांसाठी विविध खेळांचेही आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान गोळीबार करण्यात आला होता.

अमेरिकेत गोळीबाराची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी अमेरिकेतील इंडियाना वॉलमार्ट स्टोअरमध्ये एका व्यक्तीने पोलिसांवर गोळीबार केला होता. मात्र, सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो बंदूकधारी ठार झाला. या घटनेत एक जण जखमी झाला होता. इव्हान्सविले पोलिस विभागाचे सार्जंट अॅना ग्रे यांनी सांगितले की, रोनाल्ड रे मॉस्ले असे या बंदूकधारी व्यक्तीचे नाव होते. मोस्ले पूर्वी नैऋत्य इंडियाना शहरातील एका दुकानात काम करत असे.