Shocking! पेन्शन मिळवण्यासाठी पत्नीचा मृतदेह तब्बल 5 वर्षे फ्रीजरमध्ये ठेवला; आरोपी पतीला अटक, जाणून घ्या सविस्तर
तसेच ती घरात मृतावस्थेत आढळल्यानंतर आपणच तिला फ्रीजरमध्ये ठेवल्याचेही काबुल केले. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार आरोपीने आपल्या पत्नीचा मृतदेह त्याच फ्रीजरमध्ये ठेवला होता, जिथे तो अन्न साठवत होता.
आजकाल लोक पैशासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहेत. यासाठी मारामारी, खून अशा घटनाही समोर आल्या आहेत. आता एका पतीने पैशासाठी तब्बल पाच वर्षे पत्नीचा मृतदेह सांभाळून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वीडनमधून (Sweden) हे प्रकरण समोर आले आहे. माहितीनुसार, या ठिकाणी 57 वर्षीय नॉर्वेजियन व्यक्तीने पत्नीची पेन्शन मिळवण्यासाठी तिचा मृतदेह तब्बल पाच वर्षे फ्रीजरमध्ये ठेवला होता. ही घटना उघडण्यास आल्यानंतर या कृत्यासाठी त्याला कठोर शिक्षा झाली आहे.
हे जोडपे स्वीडनची राजधानी स्टॉकहोमच्या पश्चिमेला सुमारे 340 किलोमीटर अंतरावर असलेल्या Årjäng मध्ये राहत होते. अहवालानुसार, 57 वर्षीय आरोपीची पत्नी 2018 मध्ये कर्करोगाने मरण पावली होती. मात्र त्याने तब्बल 5 वर्षे आपली पत्नी अद्याप जिवंत असल्याचा दावा करून त्याच्या मित्रांना आणि कुटुंबियांना फसवले. जेव्हा-जेव्हा कोणी या महिलेशी संपर्क साधायचा प्रयत्न करायचा तेव्हा-तेव्हा महिलेचा पती ती विविध कारणांनी व्यस्त असल्याचे सांगायचा. अखेर महिलेच्या कुटुंबीयांचा तिच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आणि या वर्षी मार्चमध्ये महिलेचा मृतदेह एका फ्रीजरमध्ये सापडला. आरोपीने तिचा मृत्यू लपवून तिचा मृतदेह स्वतःजवळ ठेवल्याची कबुली दिली. तसेच ती घरात मृतावस्थेत आढळल्यानंतर आपणच तिला फ्रीजरमध्ये ठेवल्याचेही काबुल केले. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार आरोपीने आपल्या पत्नीचा मृतदेह त्याच फ्रीजरमध्ये ठेवला होता, जिथे तो अन्न साठवत होता. या काळात, त्याला पेन्शन आणि कर सवलत मिळत राहिली, जे एकूण 1.2 दशलक्ष नॉर्वेजियन क्रोनर ($116,000) पेक्षा जास्त होते. (हेही वाचा: Shocking Video- Man Gropes Journalist: स्पेन मध्ये महिला पत्रकारासोबत पुरूषाचं ऑन कॅमेरा गैरवर्तन; आरोपी अटकेत)
आता आरोपी पतीला नागरी स्वातंत्र्याचे घोर उल्लंघन, घोर फसवणूक, मृतदेहाचे विटंबन आणि खोटी कागदपत्रे तयार करणे या आरोपांवर दोषी ठरवण्यात आले. आरोपीच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, त्याला सार्वजनिक स्मशानभूमीऐवजी आपल्या शेतात पत्नीचा मृतदेह दफन करायचा होता. आपल्या मृत पत्नीची अशी इच्छा असल्याचा दावा त्याने केला. सुरुवातीला त्याने मृतदेह आपल्या मालमत्तेवर दफन करण्याच्या उद्देशाने फ्रीजरमध्ये ठेवला, परंतु ही योजना कधीच सफल झाली नाही. सोमवारी स्वीडिश न्यायालयाने त्याला 3.5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.