Shocking! मारहाण करून गळा दाबला; 14 वर्षांच्या मुलीने प्रियकराच्या मदतीने केली आईची हत्या, समोर आले धक्कादायक कारण

या हत्येतील सर्व आरोपींचे वय 14 ते 17 दरम्यान आहे. त्यांच्यावर खून आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते एक महिना बालसुधारगृहात राहणार आहेत.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

रशियामध्ये (Russia) एका 14 वर्षीय मुलीला तिच्या आईच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अनास्तासिया मिलोस्काया (Anastasia Milosskaya) असे या आईचे नाव असून ती 38 वर्षांची होती. अनास्तासिया हिला मारहाण करून तिचा गळा दाबून खून करण्यात आला. त्यानंतर मॉस्कोच्या बालशिखा टाउनशिपमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात तिचा मृतदेह टाकण्यात आला. पोलिसांना तिचा मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला आढळून आला.

या मुलीवर आरोप आहे की, तिने तिच्या 15 वर्षांच्या प्रियकरासह आपल्या आईला मारण्याचा कट रचला. यासाठी दोघांनी दोन मारेकऱ्यांना सुपारी दिली होती. या मुलीचा प्रियकर तिच्याच फ्लॅटमध्ये राहत होता, असे सांगण्यात येत आहे. मिलोस्कायाचा मृतदेह दोन दिवसांनंतर प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला आढळल्यानंतर ही बाब उघडकीस आली. द सनने याबाबत वृत्त दिले आहे.

मॉस्कोच्या बालशिखा शहरातील कचराकुंडीत मृतदेह फेकला होता. डस्टबिनमध्ये मृतदेह पडलेला स्थानिक चौकीदाराने पाहिल्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, मृत महिलेची निर्घृण हत्या करण्यापूर्वी तिला जबर मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर तिचा संपूर्ण चेहरा लाल झाला होता, सुजला होता. त्यानंतर तिचा गळा दाबण्यात आला.

माहितीनुसार, आईने आपल्या मुलीच्या वाईट संगतीवर प्रश्न उपस्थित केला होता. प्रियकराशी ब्रेकअप करून त्याला घर सोडण्यास सांगितले होते. यामुळे संतापलेल्या मुलीने आईची हत्या करण्यासाठी दोन्ही मारेकऱ्यांना 3650 पौंड (सुमारे 3 लाख 74 हजार रुपये) चे कंत्राट दिले. त्यानंतर 24 मार्च 2023 रोजी मारेकऱ्यांनी अनास्तासियाची निर्घृण हत्या केली. आईच्या 30,000 पौंड (सुमारे 30 लाख 80 हजार रुपये) बचतीवरही मुलगी आणि तिचा प्रियकराची नजर असल्याचे तपास समितीचा दावा आहे. (हेही वाचा: काय सांगता? 5 वर्षांच्या मुलीने आईला न माहिती होता Amazon वरून मागवली 2.47 लाख रुपयांची खेळणी व बूट; जाणून घ्या काय घडले पुढे)

मुलीच्या एका मित्राने पोलिसांना सांगितले की, ‘ती तिच्या आईचा तिरस्कार करत होती. परंतु तिची आई खूप चांगली व्यक्ती होती आणि आपल्या मुलीवर ती प्रेम करत होती. सध्या आरोपी मुलांना जास्तीत जास्त 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. या हत्येतील सर्व आरोपींचे वय 14 ते 17 दरम्यान आहे. त्यांच्यावर खून आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते एक महिना बालसुधारगृहात राहणार आहेत.