Sex With Own Daughter: स्वयंघोषित बाबाच्या तब्बल 20 बायका; स्वतःच्या 9 वर्षांच्या मुलीशी लग्न करून नियमित सेक्स, पोलिसांकडून अटक

गाडीत एक सोफा आणि टॉयलेटची बादली होती. अॅरिझोना, उटाह, नेवाडा येथे तो मुलींची तस्करी करत असल्याचे पुरेसे पुरावे असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

एकापेक्षा अधिक विवाह (Polygamist) करणाऱ्या अनेक लोकांच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. आता अमेरिकेतील अॅरिझोनामध्ये (Arizona) असेच बहुपत्नी असलेल्या व्यक्तीचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सॅम्युअल रॅपिली बेटमन (Samuel Rappylee Bateman) असे या व्यक्तीचे नाव असून, आरोप आहे की सॅम्युअलच्या तब्बल 20 बायका आहेत. यातील अनेक अल्पवयीन असल्याचेही समोर आले आहे. यातील सर्वात विकृत गोष्ट म्हणजे, सॅम्युअलने आपल्याच 9 वर्षांच्या मुलीशी लग्न केले आहे व तो नियमित तिच्यासोबत सेक्स करत होता.

आरोपीने स्वतःला 'पैगंबर' म्हणवून या मुलींशी लग्न केले आहे. त्याने बहुतेक 15 वर्षांखालील मुलींची लग्ने केली आहेत. आता त्याच्यावर व्यभिचार, प्रौढ आणि मुलांसोबत सामूहिक लैंगिक संबंध, बाल लैंगिक तस्करी असे आरोप आहेत. सॅम्युअलला पोलिसांनी अटक केली आहे. रिपोर्ट्सनुसार, सॅम्युअलने 2019 मध्ये 50 लोकांच्या छोट्या गटाचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली. या गटाचे नाव आहे मूलतत्त्ववादी चर्च ऑफ जिझस क्राइस्ट ऑफ लॅटर-डे सेंट्स (Church of Jesus Christ of the Latter-Day Saints).

या गटावर नियंत्रण ठेवत तो स्वत:ला 'प्रेषित' म्हणवू लागला. एक वेळ अशी आली जेव्हा त्याने स्वतःच्या मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. याशिवाय त्याने आपल्या तीन अनुयायांना आपल्या मुलींसोबत सेक्स करण्यास सांगितले. त्यांच्यापैकी एक फक्त 12 वर्षांची होती. एफबीआयच्या कागदपत्रांनुसार, 46 वर्षीय सॅम्युअलने आतापर्यंत 20 महिलांशी लग्न केले आहे. त्यापैकी बहुतेक मुली 15 वर्षाखालील आहेत.

पोलिसांनी जेव्हा त्याला अटक केली तेव्हाही तो मुलींना वाहनांतून राज्यभर फिरवत होता. गाडीत एक सोफा आणि टॉयलेटची बादली होती. अॅरिझोना, उटाह, नेवाडा येथे तो मुलींची तस्करी करत असल्याचे पुरेसे पुरावे असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. पोलिसांनी त्याची गाडी थांबवली तेव्हा त्यात दोन मुली होत्या. त्यानंतरच पोलिसांनी त्याच्यावर बाल अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. प्रथम त्याला या प्रकरणात जामीन मिळाला. (हेही वाचा: जगात दररोज जखमा आणि हिंसाचारामुळे तब्बल 12 हजार लोकांचा मृत्यू; WHO चा धक्कादायक अहवाल)

मात्र तो पुन्हा अन्य आरोपांमध्ये पकडला गेला. पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासाठी छापे टाकले आणि 9 पीडितांना ताब्यात घेतले. एफबीआयने छापा टाकल्यानंतर त्याला अटक करून ऍरिझोना तुरुंगात ठेवले. त्याने अल्पवयीन महिलांशी लग्न केले आणि त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले या आरोपाखाली सप्टेंबरपासून त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा केले जात आहेत.