IPL Auction 2025 Live

Sex Tourism: वाढत्या गरिबीमुळे जपानी महिला निवडत आहेत देहव्यापाराचा मार्ग; Tokyo बनत आहे 'सेक्स टुरिझम' हब

पण कोविड-19 नंतरच्या परिस्थितीने या शहराचा चेहरामोहराच बदलून टाकला. आर्थिक संकट, कमकुवत जपानी येन आणि वाढत्या परदेशी पर्यटकांमुळे ते सेक्स टुरिझमचे केंद्र बनले आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

कोविड-19 महामारीमुळे जगभरात आर्थिक अस्थिरता निर्माण झाली. त्यानंतर अजूनही अनेक देश त्यातून बाहेर पाडण्यासाठी धडपडत आहेत. जपान (Japan) हा त्यातीलच एक देश. असे म्हटले जाते की, कोणत्याही देशात सेक्स टुरिझम (Sex Tourism) वाढण्याचे मुख्य कारण गरिबी हे आहे. गरिबीमुळे लोकांना रोजगार मिळत नाही आणि त्यामुळे महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जाते. ही एक गंभीर समस्या आहे. आता कर्जाचा ताण आणि कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे जपानमधील अनेक महिलांना देहव्यापाराकडे ढकलले आहे. जगातील विकसित देशांपैकी एक असलेला जपान, आशियातील लैंगिक पर्यटनाची राजधानी म्हणून उदयास आला आहे.

टोकियो हे आशियातील झपाट्याने विकसित होत असलेले सेक्स टुरिझम हब म्हणून ओळख निर्माण करत आहे. इथल्या रस्त्यावर विदेशी पर्यटकांची जमलेली गर्दी आणि त्यांचे हेतू याची कहाणी सांगतात. टोकियोकडे नेहमीच आर्थिक आणि सांस्कृतिक शक्तीस्थान म्हणून पाहिले गेले आह्रे. पण कोविड-19 नंतरच्या परिस्थितीने या शहराचा चेहरामोहराच बदलून टाकला. आर्थिक संकट, कमकुवत जपानी येन आणि वाढत्या परदेशी पर्यटकांमुळे ते सेक्स टुरिझमचे केंद्र बनले आहे.

कोविड-19 दरम्यान लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. महिलांसाठी हे संकट अधिक गडद होते. उपजीविकेच्या मर्यादित साधनांमुळे अनेक महिलांना देहव्यापारात उतरावे लागले. जपानी येन कमकुवत झाल्यामुळे टोकियो हा परदेशी पर्यटकांसाठी स्वस्त आणि आकर्षक पर्याय बनला आहे. थायलंडमधील बँकॉकप्रमाणेच टोकियोही आता विदेशी पुरुषांना सेक्स टुरिझमसाठी आकर्षित करत आहे. यामध्ये चिनी पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. (हेही वाचा: https://marathi.latestly.com/world/pakistan-beggar-feast-pakistani-beggar-gave-feast-to-20-thousand-people-1-25-crore-spent-video-viral-watch-video--579631.html)

दरम्यान, देह व्यापारात गुंतलेल्या महिलांना अनेकदा हिंसाचार आणि लैंगिक आजारांना सामोरे जावे लागते. कमकुवत सामाजिक सुरक्षा आणि कायदा आणि सुव्यवस्थेमुळे ते या समस्यांपासून स्वतःचे संरक्षण करू शकत नाहीत. जपानमध्ये कायद्याची ढिलाई आणि त्याची कमकुवत अंमलबजावणी यामुळे महिलांना देहव्यापारात अधिक असुरक्षित बनवले आहे. याउलट, नेदरलँड्स सारख्या देशांमध्ये जेथे वेश्याव्यवसाय कायदेशीर आहे, ते कठोर नियमांनुसार नियंत्रित केले जाते.