Saudi Arabia's 1st Alcohol Store: सौदी अरेबियात उघडणार पहिले दारूचे दुकान; निर्बंधांसह मिळणार मद्य, जाणून घ्या सविस्तर

इस्लाममध्ये दारू पिण्यास मनाई आहे, मात्र आता अति-परंपरावादी मुस्लिम देशात पर्यटन आणि व्यवसाय वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Liquor | Image used for representational purpose | (Photo Credit: Wikimedia Commons)

सौदी अरेबियाची (Saudi Arabia) राजधानी रियाधमध्ये लवकरच दारूचे पहिले दुकान (Alcohol Store) सुरू करण्याची तयारी सुरू आहे. विशेषत: बिगर मुस्लिम मुत्सद्दींसाठी हे स्टोअर उघडण्यात येणार आहे. यासंबंधीचे सरकारी दस्तऐवजही प्रसिद्ध करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, या ठिकाणी दारू विकत घेण्यासाठी ग्राहकांना मोबाइल अॅपद्वारे नोंदणी करावी लागेल, परराष्ट्र मंत्रालयाकडून क्लिअरन्स कोड घ्यावा लागेल आणि त्यांच्या खरेदीसह मासिक कोटा नियमांचे पालन करावे लागेल.

सौदी क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या प्रयत्नांमध्ये हे पाऊल एक मैलाचा दगड आहे. इस्लाममध्ये दारू पिण्यास मनाई आहे, मात्र आता अति-परंपरावादी मुस्लिम देशात पर्यटन आणि व्यवसाय वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. सौदी प्रिन्सचे हे पाऊल 'व्हिजन 2030' योजनेचाही एक भाग आहे. सौदी प्रिन्सचे व्हिजन 2030 चे उद्दिष्ट स्थानिक उद्योग आणि लॉजिस्टिक केंद्रे विकसित करणे, यासोबतच सौदी नागरिकांसाठी लाखो नोकऱ्या निर्माण करणे हे आहे.

नवीन स्टोअर रियाधच्या डिप्लोमॅटिक क्वार्टरमध्ये स्थित असेल. येथे मोठ्या संख्येने मुत्सद्दी राहतात. मात्र इतर गैर-मुस्लिम स्थलांतरितांना दुकानातून दारू विकत घेण्याची परवानगी दिली जाईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सौदी अरेबियामध्ये लाखो प्रवासी राहतात, परंतु त्यापैकी बहुतेक आशिया आणि इजिप्तमधील मुस्लिम कामगार आहेत. येत्या आठवड्यात हे स्टोअर सुरू होण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा: South Africa Crime: एक मृतदेह लपवण्यासाठी केले 76 खून; Johannesburg येथील इमारतीला लागलेल्या आगीच्या प्रकरणात आरोपीचा धक्कादायक खुलासा)

दरम्यान, सौदी अरेबियामध्ये दारू पिण्याविरुद्ध कठोर कायदे आहेत, ज्यामध्ये शेकडो फटके, निर्वासन, दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा समाविष्ट आहे. यासोबतच परप्रांतीयांना हद्दपारीचाही सामना करावा लागतो. आता फटके मारण्याच्या शिक्षेची जागा तुरुंगवासाच्या शिक्षेने घेतली आहे. दरम्यान, अलीकडच्या काळात सौदी अरेबियामध्ये अनेक सुधारणा दिसून आल्या आहेत. अनेक कडक नियम शिथिल करण्यात आले आहेत. प्रिन्स मोहम्मद यांची सत्तेवरील पकड मजबूत होत असताना हे अनेक बदल दिसून आले. सौदी अरेबियामध्ये आता गैर-धार्मिक पर्यटन आणि संगीत महोत्सवांनाही परवानगी देण्यात आली आहे.



संबंधित बातम्या

PAK vs SA 1st ODI 2024 Scorecard: पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे पाकिस्तानला 240 धावांचे लक्ष्य; हेनरिक क्लासेनच्या फलंदाजीने उडवला धुवा, पहा स्कोअरकार्ड

ZIM vs AFG 1st ODI 2024: अफगाणिस्तान-झिम्बाब्वे यांच्यातील पहिला वनडे सामना मुसळधार पावसामुळे रद्द; 9.2 षटकांचाच खेळ झाला

South Africa vs Pakistan 1st ODI 2024 Live Streaming: आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी