सौदी अरेबियाने तबलिगी जमात म्हणजे दहशतवादाचे दरवाजे आणि धोकादायक समाज म्हणत घातली बंदी

सौदी अरेबियाने (Saudi Arabia) तबलिगी जमातीला ( Tablighi Jamaat) दहशतवादाचे दरवाज्यांपैकी एक असल्याचे म्हणत त्यांच्यावर बंदी घातली आहे. सौदी इस्लामी प्रकरणात मंत्रालयाने मस्जिदींना शुक्रवारच्या धर्मोपदेशच्या दरम्यान लोकांना तबलिगी जमाती सोबत जोडले जाण्याच्या विरोधात चेतावणी देण्याचे निर्दशन दिले

Tablighi Jamaat members at Delhi's Nizamuddin Markaz (Photo Credits: IANS)

सौदी अरेबियाने (Saudi Arabia) तबलिगी जमातीला ( Tablighi Jamaat) दहशतवादाचे दरवाज्यांपैकी एक असल्याचे म्हणत त्यांच्यावर बंदी घातली आहे. सौदी इस्लामी प्रकरणात मंत्रालयाने मस्जिदींना शुक्रवारच्या धर्मोपदेशच्या दरम्यान लोकांना तबलिगी जमाती सोबत जोडले जाण्याच्या विरोधात चेतावणी देण्याचे निर्दशन दिले. देशातील इस्लामी प्रकरणाच्या मंत्र्यांनी सोशल मीडियात सुन्नी इस्लामी संघटनेला दहशतवादाचे दरवाजे म्हणत त्यांच्यावर बंदी घालण्याची घोषणा केली. त्याचसोबत तबलिगी जमात ही समाजासाठी धोका असल्याचे ही त्यांनी म्हटले.

सिलसिलेवार ट्विट्समध्ये मंत्रालयाने म्हटले, डॉ. अब्दुल्लातिफ अल-अलशेख मस्जिद आणि त्या मस्जिदींचे प्रचारक ज्यामध्ये शुक्रवारची नमाज अस्थायी रुपात होते. त्यांना पुढील शुक्रवारी धर्मोपदेशला 6/5/1443 एएचच्या विरोधात चेतावणी देण्यासाठी सांगण्यात आले आहे. या व्यतिरिक्त मंत्रालयाने निर्देशन दिले की, धर्मोपदेशात खाली दिलेले विषय सुद्धा सहभागी केले जाणार आहेत. या विषयांबद्दल लोकांना सांगायचे आहेत.(Viral Video: पाकिस्तानातील महागाईवरुन सोशल मीडियात पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीकास्त्र, व्हिडिओही व्हायरल)

-या समूहाची दिशाबूल, प्रवृत्ती आणि धोका हे दशतवादाच्या दरवाज्यांपैकी एक आहे. परंतु ते तसे नसल्याचा दावा करतात.

-तबलिगी जमातीच्या सर्वात प्रमुख चुकांचा उल्लेख करा.

-उल्लेख करा की, तबलिगी जमात समाजातासाठी धोका आहे.

-सौदी अरेबियामध्ये (तबलीगी आणि दावा गट) यासह पक्षपाती गटांशी संबंध ठेवण्यास बंदी आहे असे विधान करा.

दरम्यान, तबलिगी जमातीचा अर्थ म्हणजे 'विश्वास निर्माण करण्यासाठी समाज' याची स्थापना भारतात 1926 रोजी झाली होती. हा समाज मुस्लिम बांधवांना धार्मिक रुपात राहण्याची पद्धत सांगतो. खासकरुन व्यक्तिगत व्यवहार, पोशाख आणि शिस्त. तबलिगी जमातीचे जगभरात 40 कोटी सदस्य असल्याचा अंदाज आहे.

तर गेल्या वर्षात कोरोना व्हायरसच्या सुरुवातीलाच देशभरात या संघटनेबद्दल जोरदार चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी जमातीने कथित रुपात कोरोनाचा प्रसार केल्याचा आरोप लावण्यात आला होता. या व्यतिरिक्त तबलिगींनी कोणत्याही परवानगी शिवाय मोठ्या संख्येने लोकांना दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकज मध्ये एकत्रित बोलावले होते. बहुसंख्येने आलेल्या संघटनेच्या लोकांमध्ये काही विदेशातील नागरिकांचा सुद्धा समावेश होता. मात्र कोरोनाच्या काळात ऐवढ्या मोठ्या संख्येने जमल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now