Samsung (Photo Credit: Fortune)

स्मार्टफोन कंपनी (Smartphone Company) सॅमसंगने (Samsung) चीनला मोठा धक्का दिला आहे. सॅमसंग उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) मोबाईल डिस्प्लेचा प्रकल्प (Mobile OLED Display) उभारणार आहे. यासाठी सॅमसंगकडून तब्बल 5 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. भारतातील अव्वल स्मार्टफोन विक्रेत्यांपैकी एक असलेल्या सॅमसंगने या प्रकल्पात 2019 मध्ये उत्तर प्रदेश सरकारशी सामंजस्य करार केला होता. चीनपेक्षा भारतात करारामध्ये जास्त सूट मिळाल्याने सॅमसंगने भारतात प्रकल्प उभा करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, सॅमसंग चीनमधून आणखी काही प्रकल्प हलविण्याचा विचार करत आहे. सॅमसंगच्या भारतातील या गुंतवणूकीमुळे देशातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सॅमसंग ही जगातील सर्वात मोठी OLED डिस्प्ले बनवणारी कंपनी आहे. सॅमसंगने हाचं ओएलईडी प्रकल्प उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे उभारण्याचा निर्णय घेतला आहे, असं उत्तर प्रदेशचे उद्योग मंत्री सतीश महाना यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - बीजिंग एअरपोर्टतर्फे 1,255 उड्डाणे रद्द; चीनमध्ये कोरोना व्हायरसची नवी लाट येण्याच्या भीतीपोटी घेतला निर्णय)

कोरोना व्हायरसच्या प्रसारावरून चीनवर अनेक देशांची नाराजी आहे. त्यामुळे भारत चीनमध्ये असलेल्या विविध कंपन्यांना आकर्षित करत आहे. विशेष म्हणजे अनेक कंपन्यांनी भारतात आपले प्रकल्प हलवण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा - Boycott Of Chinese Goods: चीनी प्रोडक्ट्सवर बॉलिवूडसह क्रिडा क्षेत्राने बहिष्कार टाकण्याचे CAIT यांचे आवाहन)

याशिवाय, मोबाईल कंपनी लावाने देखील चीनमधील प्रकल्प बंद करून भारतात प्रकल्प उभारणार असल्याची घोषणा केली आहे. लावा कंपनी भारतातून चीनला मोबाईल निर्यात करणार आहे. त्यासाठी लावा भारतात पुढील 5 वर्षांसाठी 800 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.