Russian Research Centre मध्ये COVID-19 आणि Flu शी सामना करणारं Combined Vaccine बनवण्याचे प्रयत्न सुरू; जाणून घ्या रशियामधील कोविड 19 लसीबद्दलचे महत्त्वाचे अपडेट्स

दरम्यान रशियाने कोविड 19 साठी 2 लसींची नोंदणी केली आहे. आता या तिसर्‍या लसीवर काम सुरू आहे.

Coronavirus Vaccine Representational Image (Photo Credits: ANI)

रशियामध्ये (Russia) आता कोविड 19 आणि फ्लू या दोन्ही आजारांचा मुकाबला केला जाऊ शकतो अशी लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. Sputnik News,च्या माहितीनुसार, रशियन Scientific Center of Virology and Biotechnology, Vector सध्या या दुहेरी लसीसाठी काम करत आहे. दरम्यान रशियाने कोविड 19 साठी 2 लसींची नोंदणी केली आहे. आता या तिसर्‍या लसीवर काम सुरू आहे. COVID-19 Vaccine Update: रशियामध्ये कोरोनावरील Sputnik V लस देशवासियांसाठी उपलब्ध करण्यास सुरूवात- रिपोर्ट्स

 

Vector's Director Rinat Maksyutov यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमच्या संस्थेकडून सध्या कोविड 19 आणि सिझनल फ्लू या दोन्हींवर काम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान रशियामध्ये Sputnik V नंतर EpiVacCorona ही Vector ने विकसित केलेली दुसरी कोविड 19 वरील लस आहे. दरम्यान ही लस देखील सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान निरोगी लोकांसोबतच अ‍ॅलर्जीचा त्रास, वयोवृद्ध लोकं यांनादेखील ही लस उपयुक्त आहे. लवकरच वॅक्सिनमधील कोणतेही घटक न बदलता ती 14-17 वयोगटातील मुलांवर देखील क्लिनिकल ट्रायलच्या माध्यमातून तपासण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

रशियातील कोविड 19 वरील लसींच्या बाबतीतील महत्त्वाच्या घडामोडी

रशियाचे राष्ट्राध्यक्ष Vladimir Putin यांनी माहिती देताना लस निर्यात करण्यापेक्षा त्या लसीचे डोस नागरिकांना लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याकडे भर असेल. त्या प्राधान्यक्रमानुसार लस बाजारात लवकर उपलाब्ध होईल असा देखील त्यांचा विश्वास आहे.