Russia-Ukraine War: तिसरे महायुद्ध झाल्यास अण्वस्त्रांचा वापर होऊ शकतो, युक्रेनवरील आक्रमणानंतर रशियाचा इशारा, जग चिंतेत
रशियाचे सरकारी प्रसारमाध्यम Sputnik ने याबाबत माहिती दिली आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine War) अवघे जग चिंतेत आहे. रशिया युक्रेनवर आक्रमकपणे चाढाई करत आहे. युक्रेनच्या खेरसनवर कब्जा मिळवल्याचा दावा रशियाने नुकताच केला आहे. रशियाचे संरक्षणमंत्री Igor Konashenkov यांनी म्हटले आहे की, रशियाच्या सशस्त्र लष्कराने खेरसन पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतले आहे. रशियाचे सैन्य युक्रेनची शहरं बेचिराख करत आहेत आज रशिया नसेनेने खारकीव मिल्ट्री अकादमीवर निशाणा साधला आहे. त्यावर रॉकेट डागले आहे. एका वृत्तानुसार, रशियन सैन्याने अनेक रहिवाशी परिसरावरही हल्ला चढवला आहे. दरम्यान, तिसरे महायुद्ध (World War III) झाले तर त्यात अण्वस्त्रांचा समावेश मोठ्या प्रमाणावर असेल असे रशियाने अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केले आहे. रशियाचे सरकारी प्रसारमाध्यम Sputnik ने याबाबत माहिती दिली आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अधिक व्यापक होते आहे. युद्धाचा आजचा सातवा दिवस आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावराव यांनी बुधवारी म्हटले की, जर तिसरे महायुद्ध (Third World War) झाले तर त्यात अण्वस्त्रांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असेल. हे युद्ध अर्थातच प्रचंड विनाशकारी असेल. (हेही वाचा, Russia-Ukraine War: रशियाने अवघ्या दोन सेकंदात क्षेपणास्त्राने उद्ध्वस्त केली प्रशासकीय इमारत; Watch Video)
ट्विट
दरम्यान रशिया आणि युक्रेन यांच्यात पाठिमागील काही दिवसांपासून लढाई सुरु आहे. हे युद्ध थांबविण्यासाठी दोन्ही देशांमध्ये मधल्या काळात एक चर्चाही झाली. मात्र, त्या चर्चेला विशेष यश आले नाही. रशिया वेगाने युक्रेनच्या अनेक शहरांवर हल्ला करत आहे. युक्रेनच्या खारकीव येथे रशियन सैन्य मोठ्या प्रमाणावर सरकारी कार्यालये आणि इमारतींना लक्ष्य करते आहे. युक्रेनची राजधानी कीव येथील भारतीय दूतावास बंद केले आहे.