Russia-Ukraine Crisis: रशियाकडून 16 फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला केला जाणार, अमेरिकेसह वर्ल्ड बँक, IMF यांनी उचलले 'हे' पाउल

युक्रेनमध्ये रशियाच्या संभावित हल्ल्याची परिस्थिती पाहता वर्ल्ड बँक आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांनी सोमवारी अस्थायी रुपात तेथील आपल्या स्टाफला दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केले आहे.

Ukrain-Russia Crisis (Photo Credits-Twitter)

Russia-Ukraine Crisis: युक्रेनमध्ये रशियाच्या संभावित हल्ल्याची परिस्थिती पाहता वर्ल्ड बँक आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांनी सोमवारी अस्थायी रुपात तेथील आपल्या स्टाफला दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केले आहे. दरम्यान, दोन्ही संस्थांनी म्हटले की युक्रेनच्या प्रति त्यांचे समर्थन सुरु राहिले. दुसऱ्या बाजूला युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर जेलेंस्की यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी 16 फेब्रुवारीला रशिया द्वारे युक्रेनवर हल्ला केला जाणार आहे. जेलेंस्की यांनी आपल्या पोस्टमध्ये असे ही म्हटले की, ते बातचीतच्या माध्यमातून प्रत्येक वादावर तोडगा काढू पाहत आहेत.

वर्ल्ड बँकेने जाहीर केलेल्या आपल्या इंटरनल मेमोमध्ये सांगण्यात आले की, त्यांनी युक्रेन मधील आपल्या स्टाफ मिशनला निरस्त केले  असून सीमेवर करडी नजर ठेवली जात आहे.  रशियाकडून मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आले आहे. मेमो मध्ये असे ही म्हटले की, वर्ल्ड बँक ग्रुपसाठी आपला स्टाफ किंवा त्यांच्या परिवाराची सुरक्षितता महत्वाची आहे. परंतु  असे सांगण्यात आलेले नाही की, किती स्टाफला स्थलांतरित केले जाणार आहे.

अमेरिकेने आपल्या युक्रेन स्थित दूतवासाला राजधानी कीव येथून हटवून पश्चिमी शहर लीव येथे नेले आहे. IMF कडून युक्रेनसाठी 5 बिलियन डॉलरचे कर्ज दिले गेले होते. तर वर्ल्ड बँकेने सुद्धा 1.3 बिलियन डॉलरचे आर्थिक मदत केली आहे. (ISIS लिडर अबू इब्राहिम अल हाशिम अल कुरैशी याचा अमेरिकेच्या सैन्याकडून खात्मा, जो बायडेन यांची माहिती)

रशिया आणि युक्रेनमध्ये सातत्याने तणाव वाढत आहे. याच दरम्यान G7 च्या आर्थिक मंत्र्यांनी सोमवारी असे म्हटले की, ते युक्रेनच्या क्षेत्रात रशियाच्या सैनिकांद्वारे करण्यात येणाऱ्या आक्रमणाच्या स्थितीत रशियावर सामूहिक रुपात गंभीर प्रतिबंध लावण्यास तयार आहे. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जापान, ब्रिटेन आणि अमेरिकेने एका विधानात असे म्हटले की, आम्ही सामूहिक रुपायने आर्थिक आणि वित्तिय प्रतिबंद लावण्यासाठी तयार आहोत. याचा रशियाच्या अर्थव्यवस्थेवर व्यापक आणि तत्काल परिणाम होईल.