भावाची क्रूरता! लहान बहिणी घरात करत होत्या गोंधळ, रागाच्या भरात त्याने दोघींना 8 व्या मजल्यावरून खाली फेकले; दोघींचाही मृत्यू
Murder | (Photo Credits: PixaBay)

रशियात (Russia) एका व्यक्तीचे एक धक्कादायक कृत्य समोर आले आहे जे ऐकून कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. या नराधमाने आपल्या दोन अल्पवयीन बहिणींना 8 व्या मजल्यावरून खाली फेकून दिले आहे, ज्यामध्ये दोघींचा मृत्यू झाला आहे. ही भीषण घटना घडवणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे आहे की, या मुली घरात खूप दंगा करीत होत्या म्हणून त्याने या दोघींनाही खाली फेकून दिले. ओचूर संचित असे या नराधमाचे नाव असून तो 23 वर्षांचा आहे. रशियातील हॅलोविनमधील या मुलींच्या घरातील एका खोली तो भाड्याने राहत होता.

याच अपार्टमेंटमधील घराच्या खिडकीमधून त्याने दोन मुलींना खाली फेकून दिले. यातील एक मुलगी 9 वर्षांची होती, तर दुसरी 14 वर्षांची होती. या मुलींची आई संचितची नातलग आहे. मुलींना फेकून दिल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. यानंतर मुलींच्या मृत्यूप्रकरणी ओचूर संचितला अटक करण्यात आली. जेव्हा आरोपीला पोलिसांनी अटक केली तेव्हा त्याने सांगितले की, मुली फ्लॅटमध्ये इतका आवाज-गोंधळ करत होत्या की त्याचे डोके फिरले. त्यानंतर रागाच्या भरात त्याने दोन्ही मुलींना आठव्या मजल्यावरून खिडकीतून खाली फेकून दिले. (हेही वाचा: Afghanistan: लग्नात गाणी वाजवल्याने मिळाली शिक्षा, तालिबान्यांनी 13 लोकांना केले ठार)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दोन्ही अल्पवयीन बहिणींना फ्लॅटमधून खाली फेकल्याची कबुली दिली आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, मृत मुलींची आई रात्रीच्या शिफ्टमध्ये कॅफेमध्ये काम करत होती, घटनेच्या वेळी ती घरी नव्हती. शेजाऱ्यांनी तिला घटनेची माहिती दिली. मुली खाली पडल्याच्या किंकाळ्यांनी शेजाऱ्यांना याची माहिती मिळाली. 80 फूट खाली पडल्याने एका बहिणीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या बहिणीचा रुग्णालयात मृत्यू झाला. आरोपीला यापूर्वीही चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.