Girlfriend जेलमध्ये कैदी Boyfriend ला गेली भेटायला, Kiss केल्यानंतर तरुणाचा मृत्यू, गुन्हा दाखल
जेव्हा दोघांनी चुंबन घेतले तेव्हा रेचेलने तिच्या तोंडातून औषध ब्राउनच्या तोंडात टाकले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, औषधाचे वजन सुमारे 14 ग्रॅम होते आणि ओव्हरडोजमुळे ब्राउनचा मृत्यू झाला.
चुंबन (Kiss) ही एक अतिशय वैयक्तिक भावना आहे. ज्याला नात्यात स्वतःचे महत्व आहे. पण त्याचे महत्त्व केवळ दोन व्यक्तींच्या प्रेमापुरते मर्यादित नाही. चुंबन घेतल्याने मूड चांगला राहतो आणि समोरच्या व्यक्तीसोबतचे नाते घट्ट होते. चुंबन घेणे तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठीही चांगले असते असे मोठमोठे डॉक्टर सांगत असले तरी चुंबन केल्याने मृत्यूही होतो असे तुम्ही ऐकले आहे का? नसेल तर असाच एक मुद्दा सध्या चर्चेत आहे. हे धक्कादायक प्रकरण अमेरिकेतील टेनेसी जेलमधील आहे. जिथे जोशुआ ब्राउन (Joshua Brown) नावाचा कैदी (Prisoner) शिक्षा भोगत होता. कैद्याला भेटायला आलेल्या त्याच्या जवळच्या मैत्रिणीने त्याचं चुंबन घेत त्याची हत्या केली.
रिपोर्टनुसार, चुंबनादरम्यान महिलेने तोंडात ड्रग्ज ठेवले होते. जेव्हा दोघांनी चुंबन घेतले तेव्हा रेचेलने तिच्या तोंडातून औषध ब्राउनच्या तोंडात टाकले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, औषधाचे वजन सुमारे 14 ग्रॅम होते आणि ओव्हरडोजमुळे ब्राउनचा मृत्यू झाला. कैद्याच्या मृत्यूनंतर, टेनेसी डिपार्टमेंट ऑफ करेक्शन (TDOC) च्या एजंटांनी रॅशेलला ताबडतोब ताब्यात घेतले. हेही वाचा Loud Sex: एखाद्या Pornstars प्रमाणे आवाज काढत सेक्स करत असे जोडपे; वैतागलेल्या शेजाऱ्यांनी दिला 'हा' सल्ला, घ्या जाणून
मंगळवारी, टीडीओसीने एक निवेदन जारी केले की, राहेलला अंमली पदार्थांची तस्करी आणि कैद्याच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. डॉलार्डला ताब्यात घेण्यात आले. टीडीओसीने मंगळवारी एक निवेदन जारी केले की, राहेलवर टर्नी सेंटर इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्समध्ये ड्रग तस्करी आणि हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. जोशून ब्राउनला ड्रग्जशी संबंधित प्रकरणी 11 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती, जी 2029 मध्ये संपणार होती.
याशिवाय याआधीही रेचेलने ब्राउनला भेटण्याच्या बहाण्याने ड्रग्स दिल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला आहे. रेचलने चौकशी दरम्यान ही कबुली दिली आहे. या घटनेनंतर टीडीओसीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, यापुढे कारागृहात कैद्यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांवर नजर ठेवली जाईल आणि कोणत्याही विदेशी वस्तू आणल्यास त्याची कडक चौकशी केली जाईल. जेणेकरून अशी घटना पुन्हा घडू नये.