IPL Auction 2025 Live

PM Modi Congratulates Keir Starmer: पंतप्रधान मोदींनी केले ब्रिटनच्या नवनिर्वाचीत पंतप्रधान कीर स्टारमर यांचे अभिनंदन

दरम्यान, यूकेच्या निवडणुकीच्या निकालांमध्ये लेबर पार्टीने मोठा विजय मिळवला.

PM Modi, Keir Starmer (PC - ANI, Facebook)

PM Modi Congratulates Keir Starmer: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी यूकेचे नवनिर्वाचीत पंतप्रधान कीर स्टारमर (PM Keir Starmer) यांचे सार्वत्रिक निवडणुकीत लेबर पार्टीच्या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन केले. त्यांनी माजी पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. स्टार्मरच्या मजूर पक्षाने गुरुवारच्या संसदीय निवडणुकीत बहुमत मिळवले. 650 जागांच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये 412 जागा मिळवल्या. यामुळे 14 वर्षांच्या कंझर्व्हेटिव्ह राजवटीचा अंत झाला. दोन्ही राष्ट्रांमधील द्विपक्षीय आणि धोरणात्मक संबंध अधिक बळकट करण्यासाठी यूकेच्या नवीन सरकारसोबत सहकार्य करण्यास उत्सुक असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

यूकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उल्लेखनीय विजयाबद्दल केयर स्टारर यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. सर्व क्षेत्रांमध्ये भारत-यूके सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी, परस्पर विकास आणि समृद्धीला चालना देण्यासाठी मी आमच्या सकारात्मक आणि रचनात्मक सहकार्याची अपेक्षा करतो, असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी आपल्या X हँडलवरून केलं आहे. (हेही वाचा -Rishi Sunak Concedes Defeat: यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा सार्वत्रिक निवडणुकीत केयर स्टारमर यांच्याकडून पराभव; लेबर पार्टीने पार केला बहुमताचा आकडा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी पोस्ट - 

दुसऱ्या ट्विटमध्ये, पंतप्रधान मोदींनी ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान सुनक यांचे त्यांच्या कार्यकाळात केलेल्या प्रयत्नांबद्दल आभार मानले. 'ऋषी सुनक, तुमचे UK चे प्रशंसनीय नेतृत्व आणि तुमच्या कार्यकाळात भारत आणि UK यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी तुमच्या सक्रिय योगदानाबद्दल धन्यवाद. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भविष्यासाठी शुभेच्छा,' असं मोदी यांनी आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सुनक यांच्या नेतृत्वाखालील कंझर्व्हेटिव्ह पक्षाला इतिहासातील सर्वात वाईट निवडणूक पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, यूकेच्या निवडणुकीच्या निकालांमध्ये लेबर पार्टीने मोठा विजय मिळवला. आता स्टारमर ब्रिटनचे पुढील पंतप्रधान बनणार आहेत. लेबर पक्षाचा विजय यूकेच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण बदल दर्शवितो.