Gaza Polio Vaccination: कालच्या हल्ल्यानंतर गाझामध्ये पून्हा पोलिओ लसीकरण मोहीमेला सुरुवात

रविवारी पहाटे मध्य गाझामध्ये इस्रायली हल्ले झाल्याचे प्राथमिक वृत्त होते. या हल्ल्यात 48 जण ठार झाले होते.

Photo Credit- X

Gaza Polio Vaccination: जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) म्हटले आहे की, इस्रायलने पोलिओ लसीकरण मोहीम सुलभ करण्यासाठी लढाई मर्यादित काळात थांबवावी. त्यामुळे आज सोमवारी युद्धग्रस्त गाझामध्ये पोलिओ लसीकरण मोहीमेला(Polio Vaccination)सुरुवात करण्यात आली आहे. रविवारी पहाटे मध्य गाझामध्ये इस्रायली हल्ले झाल्याचे प्राथमिक वृत्त होते. या हल्ल्यात 48 जण ठार झाले होते.

पॅलेस्टाईन आरोग्य अधिकाऱ्यांनी हल्ल्याबाबतची माहिती दिली. हा हल्ला एन्क्लेव्ह मध्य आणि दक्षिणेकडील भागात झाला. गाझामध्ये अधिकाऱ्यांनी बुधवारपर्यंत मुलांना लसीकरण करण्याची योजना आखली आहे. मोहिमेची सुरुवात शनिवारी अल्प प्रमाणात लसीकरणाने झाली आणि सुमारे 6,40,000 मुलांचे लसीकरण करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. तीन दिवस, दिवसातील आठ तास पोलिओ लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे.(हेही वाचा:Israeli Gaza Conflict: पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अगोदरच गाझामध्ये इस्त्रायचा हल्ला, 48 ठार )

गाझामध्ये अलीकडेच 25 वर्षांतील पहिला पोलिओ केस नोंदवला गेला. 10 महिन्यांच्या मुलाला पोलिओ झाला होता. त्याच्या एका पायाला अर्धांगवायू झाला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणण्यानुसार, अर्धांगवायूच्या केसची उपस्थिती सूचित करते की आणखी शेकडो लोक पोलिओग्रसेत असू शकतात. पोलिओ झालेल्या बहुतेक मुलांना लक्षणे जाणवत नाहीत. परंतु कोणताही इलाज नाही की पोलिओमुळे अर्धांगवायू होतो. विषेश म्हणजे तो कायमचा राहतो. अर्धांगवायू श्वासोच्छवासाच्या स्नायूंवर परिणाम करत असल्याने, हा रोग घातक ठरू शकतो.(हेही वाचा: Gaza Polio Vaccinations: गाझामध्ये तीन दिवसांचा युद्धविराम; Israel आणि Hamas यांची सहमती, राबवली जाणार पोलिओ लसीकरण मोहीम- WHO)

डब्ल्यूएचओ, युनिसेफ आणि यूएनआरडब्ल्यूए यांच्या सहकार्याने पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाद्वारे या लसीकरण मोहिमेवर लक्ष ठेवले जाणार आहे. यामध्ये 2000 आरोग्य कर्मचारी सहभागी होणार आहेत. पोलिओ नष्ट करण्यासाठी डब्ल्यूएचओला गाझा पट्टीमध्ये 90 टक्के लसीकरण करावे लागेल. डब्ल्यूएचओ म्हणते की, संघर्षापूर्वी गाझा आणि वेस्ट बँकमध्ये लसीकरण पुरेसे होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2022 मध्ये गाझा आणि वेस्ट बँकमध्ये 99 टक्के लसीकरण झाले होते, जे गेल्या वर्षी 89 टक्क्यांवर आले होते. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला 11 महिन्यांपासून गाझामध्ये युद्ध सुरू आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif