G-20 Summit : 2022 साली भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी वर्षी भारत भूषवणार G-20 Summit चं यजमानपद
भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिन वर्षी G-20 Summit चं आयोजन आणि यजमानपद भूषणवण्याचा मान भारताला मिळाला आहे. 2022सालाच G-20 Summit भारतामध्ये आयोजित होईल.
G-20 Summit मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिन वर्षी G-20 Summit चं आयोजन आणि यजमानपद भूषणवण्याचा मान भारताला मिळाला आहे. 2022 सालाच G-20 Summit भारतामध्ये आयोजित होईल. त्यामुळे भारताला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या वर्षी G-20 Summit भारतामध्ये होणं हे इतर राष्ट्रांकडून भारताला मिळालेलं एक गिफ्ट असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
In 2022 India completes 75 years since Independence. In that special year, India looks forward to welcoming the world to the G-20 Summit! Come to India, the world's fastest growing large economy! Know India’s rich history and diversity, and experience the warm Indian hospitality.
— Narendra Modi (@narendramodi) December 1, 2018
ट्विटरच्या माध्यमातून माहिती देताना नरेंद्र मोदी म्हणाले, ' भारत ही झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. 2022 साली भारत स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करत आहे. भारतासाठी खास असणाऱ्या या वर्षांत जगाला G-20 Summit साठी आमंत्रित करताना आनंद होत आहे. भारतामध्ये या, भारताची संस्कृती, इतिहास, विविधता आणि आदरातिथ्य काय असतं ते पहा असं नरेंद मोदींनी म्हटलं आहे.
सध्या अर्जेटिनाची राजधानीमध्ये G-20 Summit मध्ये सहभागी होण्यासाठी नरेंद्र मोदी ब्यूनस आयर्समध्ये आहेत. दोन दिवसीय G-20 Summit च्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी G-20 Summit च्या नेत्यांना 2022 साली भारतामध्ये येण्याचं आमंत्रण दिली आहे. यावेळेस इटलीचे त्यांनी विशेष आभार मानले.
(The above story first appeared on LatestLY on Dec 02, 2018 11:06 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

