Petrol Prices: पेट्रोल 40 रुपयांनी स्वस्त, डिझेल दरात कोणताही बदल नाही; सविस्तर वृत्त
केवळ भारतच नव्हे तर जगभरातील देश महागाईमुळे चिंतेत आहेत. वाढते इंधन दर (Fuel Rate) हे महागाईला नेहमीच पुरक ठरत असतात. त्यामुळे सरकारने इंधन दर नियंत्रित करावे यासाठी जनता नेहमीच अग्रेसर असते. जनतेची मागणी विचारात घेऊन एका देशाने खरोखरच इंधन दर कमी केले आहेत.
महागाई (Inflation) हा जगभरातील देशांसमोरील मोठाच प्रश्न. केवळ भारतच नव्हे तर जगभरातील देश महागाईमुळे चिंतेत आहेत. वाढते इंधन दर (Fuel Rate) हे महागाईला नेहमीच पुरक ठरत असतात. त्यामुळे सरकारने इंधन दर नियंत्रित करावे यासाठी जनता नेहमीच अग्रेसर असते. जनतेची मागणी विचारात घेऊन एका देशाने खरोखरच इंधन दर कमी केले आहेत. हे थोडेथोडके नव्हे तर तब्बल 40 रुपयांनी होय. पण ही दरकपात केवळ पेट्रोलच्याच (Petrol Rate) वाट्याला आली आहे. डिझेलचे दर अद्यापही कायम आहेत आणि पेट्रोल दरात इतकी घसघशीत कपात करणारा देश आहे (Sri Lanka) श्रीलंका.
पेट्रोल पहिल्यांदाच डिझेल पेक्षा स्वस्त
धक्कादायक म्हणजे श्रीलंका सरकारने शनिवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ४० रुपयांची कपात केल्याने देशात पहिल्यांदाच पेट्रोल डिझेलपेक्षा स्वस्त झाले आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असतानाही किमतीचा फॉर्म्युला लागू न केल्याबद्दल विरोधी पक्षांनी अलीकडच्या काळात सरकारला धारेवर धरल्याने ही किंमत कमी झाली आहे.
पेट्रोलची किरकोळ किंमत LKR (श्रीलंकन रुपये) प्रति लिटर 450 वरून LKR 410 प्रति लीटर झाली आहे तर डिझेलची किंमत LKR 430 वर कायम आहे.ऊर्जा मंत्री कांचना विजेसेकरा यांनी यांनी माहिती देताना म्हटले की, पेट्रोलचे नवीन दर 410 रुपये श्रीलंकन रुपये असतील. (हेही वाचा, Nagpur: पेट्रोल पंपाचा 50 रुपयांच्या खाली पेट्रोल विकण्यास नकार, जाणून घ्या कारण)
सार्वजनिक वाहतूक आणि ग्राहक व्यापारासाठी वापरल्या जाणार्या वाहनांसाठी डिझेलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ज्याचा थेट परिणाम नागरिकांच्या राहणीमानाच्या खर्चावर होतो. सरकारच्या या निर्णयानंतर लंका इंडियन ऑइल कॉर्पोरेशननेही सरकारी किमतीसह पेट्रोलचे दर कमी करणार असल्याचे सांगितले आहे.
1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटाच्या दरम्यान श्रीलंकेला अति चलनवाढीचा अनुभव येत आहे. सप्टेंबरमध्ये महागाई 69.8% होती, जी ऑगस्टमध्ये नोंदवलेल्या 64.3% पेक्षा जास्त होती.