युरोप आणि इंडोनेशियामध्ये AstraZeneca लस वापरण्यास परवानगी, तर फिनलँडने लावले प्रतिबंध

युरोपियन युनियनच्या ड्रग एजन्सीने गुरुवारी सांगितले की, लसीचा वापर केल्याने रक्त गोठण्यासाठी प्रकरणे आढळल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.

Coronavirus Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

युरोपियन युनियन आणि इंडोनेशियाच्या (Indonesia) बर्‍याच देशांमध्ये ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस (AstraZeneca Vaccine) पुन्हा वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि इटलीसह काही देशांनी लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होत असल्याची तक्रारी केली होती. त्यानंतर या देशांनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसीता वापरावर प्रतिबंध घातला होता.

युरोपियन युनियनच्या ड्रग एजन्सीने गुरुवारी सांगितले की, लसीचा वापर केल्याने रक्त गोठण्यासाठी प्रकरणे आढळल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. तथापि, एजन्सीने काही दुर्मिळ क्लॉटिंग आणि लस यांच्यातील संबंधांनाही नकार दिला नाही. इटालियन आरोग्य मंत्रालयाशी संलग्न डॉ. जियोव्हानी रझा म्हणाले की, लसीवरील बंदी हटवल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आता लसीकरण मोहीम अधिक द्रुतपणे सुरू केली जाऊ शकते. (वाचा -WHO च्या मते AstraZeneca COVID-19 vaccine सुरक्षित; रक्तांच्या गुठळ्या होण्याच्या भीतीने काही देशांनी थांवबले लसीकरण)

याशिवाय इंडोनेशियातील अन्न व औषध एजन्सीने शुक्रवारी सांगितले की, त्यांनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसीपासून युरोपमधील काही लाभार्थींच्या रक्त गुठळ्या झालेल्या तक्रारींशी संबंधित अहवालाचा आढावा घेतल्यानंतर या लसीच्या वापरास मान्यता दिली आहे. एजन्सीने म्हटले आहे की, अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस घेण्याचे फायदे जास्त असून धोका कमी आहे. त्यामुळे या लसीचा पुन्हा वापर सुरू करू शकतो.

दरम्यान, शास्त्रज्ञांची टीम अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसीची तपासणी करत आहेत. या संघाला असे 18 अहवाल प्राप्त झाले आहेत, ज्यात असा दावा आहे की लस घेतल्यानंतर काही आठवड्यांनंतर लोकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या आढळून आल्या. शुक्रवारी युरोपियन मेडिसिन एजेंसीने कोरोनावरील AstraZeneca लस ही सुरक्षित असल्याचे स्पष्ट केलं आहे.