PepsiCo Layoffs: आता 'पेप्सिको'च्या कर्मचाऱ्यांवरही बरोजगारीचं संकट, शेकडो कर्मचाऱ्यांच्या नोकर कपातीचा निर्णय
पेप्सीको या नोकरकपातीत स्नॅक्स आणि शीतपेय विभागातील आपल्या यूएस मुख्यालयात शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेणार आहे.
रोज कुठल्यातरी नामांकीत कंपनीतून कर्मचाऱ्यांच्या नोकर कपातीची बातमी कानावर पडते. ट्विटर, अमेझॉन, मेटा, एचपी सारख्या बड्या कंपनीच्या निर्णया नंतर आणखी एका एका कंपनीचा या यादीत प्रवेश झाला आहे. बहुराष्ट्रीय पेय आणि खाद्य कंपनी पेपसीकोने देखील आता नोकरकपातीचा निर्णय घेतला आहे. पेपसिको शेकडो कर्मचाऱ्याची कपात करणार असल्याची माहिती पुढे येत आहे. कारण सध्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची आणि त्यांच्या दस्तवेजाचं पुनरावलोकन केल्या जात आहे, अशी माहिती वॉल स्ट्रीच जर्नल कडून देण्यात आली आहे. तरी यांत शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येणार आहे. तरी नोकरकपातीच्या जगभरात पेप्सीकॉच्या विविध प्रॉडक्सची मागणी उत्तर अमेरीकेत घटण्याची मोठी शक्यता आहे. कंपनीचं काम सुलभतेने चालण्यासाठी आणि अधिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी पेप्सिको हा मोठा निर्णय घेत असल्याची शक्यता आहे.
गेले वर्षभरात म्हणजे २०२२ मध्ये ३ ला ९ हजार तरुणांना नव्याने रोजगातर दिला होता. त्यापैकी १ लाख २९ हजार फक्त अमेरीकेच्या कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला होता. म्हणुन या नोकर कपातीचा सर्वाधिक परिणाम अमेरीकेवर अधिक होणार आहे. गेले काही महिन्यांपूर्वीचं पेपसीकोच्या प्रॉडक्टच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली तरीही यावर्षी अपेक्षापेक्षा अधिक प्रॉडक्ट्स विकल्या गेले. पण प्रॉडक्ट्स उत्पादनासाठी लागणार साहित्य, मालाची ने आण करण्यासाठी वाहतुक आणि मजूरांवर अपेक्षा अधिक खर्च झाल्याने कंपनीला हवा तेवढा फायदा न झाल्याने कंपनीने नोकर कपातीचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. (हे ही वाचा:- OYO Layoff: आयटी कंपन्यांपाठोपाठ आता OYO कर्मचाऱ्यांनाही नारळ, कार्यप्रणालीतील बदलाचं कारण देत शेकडो कर्मचाऱ्यांची कपात)
पेप्सिकोच्या नफ्याच्या मार्जिनवरील दबाव कमी करण्यासाठी आणि मॅक्रो इकॉनॉमिक स्थिती बिघडत असल्याने नोकर कपातीसारखा मोठा निर्णयाचं पाऊल पेपसीकोने उचललं आहे. पेप्सिकोची लेज Lays, गॅटोरेड Gatorade, पेप्सी Pepsi, माउंटेन डिओ Mountain Dew, क्वाकर ओट्स Quaker Oats आणि ड्रिटोस Doritos यांसारखे विविध नामांकित ब्रँड प्रसिध्द आहे. तरी पेप्सीको या नोकरकपातीत स्नॅक्स आणि शीतपेय विभागातील आपल्या यूएस मुख्यालयात शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेणार आहे.