Penis Stuck in Tube: लिंगाची लांबी मोजणे पडले महागात, ट्यूबमध्ये अडकला प्रायव्हेट पार्ट; करावे लागली शस्त्रक्रिया

तो या इंजेक्शनचा काही फायदा झाला आहे की नाही हे तपासत होता.

Penis Stuck in Tube (संग्रहित संपादित प्रतिमा)

जगात अशी अनेक प्रकरणे समोर येतात ज्यांच्यावर विश्वास ठेवणे अवघड होते, मात्र त्यांच्याबद्दल जाणून घेतल्यानंतर एकच प्रश्न मनात उत्पन्न होतो तो म्हणजे, असे खरच घडू शकते? याआधी थायलंडच्या बँकॉक येथे एका व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट (Penis) कुलुपाच्या छिद्रात अडकल्याचे समोर आले होते. घटनेच्या 2 आठवड्यांनंतर ही व्यक्ती हॉस्पीटलमध्ये गेली होती मात्र तोपर्यंत त्याच्या प्रायव्हेट पार्टला संसर्ग झाला होता. आता थायलंडमधूनच (Thailand) अजून एक असे विचित्र प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट (Private Part) एक ट्यूबमध्ये अडकल्याचे सांगितले जात आहे.

हा 20 वर्षीय तरुण त्याचा खाजगी भाग एका ट्यूबमध्ये टाकून लिंगाचा आकार वाढला आहे की नाही हे तपासत होता. त्यावेळी खाजगी भाग ट्यूबमध्ये अडकला आणि तो बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन करावे लागले. 'डेली स्टार'च्या अहवालानुसार, या व्यक्तीने आपला प्रायव्हेट पार्ट मोठे करण्यासाठी इंजेक्शन घेतले होते. या इंजेक्शनचा काही उपयोग झाला आहे की नाही ते हा तरुण तपासात होता. यासाठी त्याने त्याचा प्रायव्हेट पार्ट ट्यूबमध्ये टाकला, पण तो तिथेच अडकला.

बराच वेळ या तरुणाने आपले लिंग त्या ट्यूबमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही. अखेर त्याला आपत्कालीन सेवेला फोन करावा लागला. घटनास्थळी पोहोचलेल्या वैद्यकीय पथकानेही ट्यूब कापण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. ट्यूब खूप टाईट बसली होती आणि थोडीशी चूक त्या तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कट करू शकली असती. यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ट्यूब काढली. (हेही वाचा: एका रात्रीत 3 वेळा घोडीसोबत केला Sex, CCTV मध्ये कैद झाले घाणेरडे कृत्य; 57 वर्षीय व्यक्तीला अटक)

तरुणाने डॉक्टरांना सांगितले की, त्याला वाटत होते की त्याचे लिंग छोटे आहे म्हणूनच त्याने मोठी रक्कम खर्च करून इंजेक्शन घेतले होते. तो या इंजेक्शनचा काही फायदा झाला आहे की नाही हे तपासत होता. युवकाला त्याच्या कृत्याची लाज तर वाटतेच मात्र त्याला स्वतःवर रागही आहे, कारण त्याला ट्यूबमधून लिंग बाहेर काढण्यासाठी ज्यादा खर्च करावा लागला.