पाकिस्तानला भारताकडून Covishield लस मिळेल अशी अपेक्षा पण 'या' कारणामुळे ती थेट मिळणार नाही

तर राज्यातील विविध ठिकाणी टप्प्याटप्प्याने लसीकरणाची मोहिम राबवली जात आहे. अशातच आता पाकिस्तान (Pakistan)भारताकडून त्यांना कोविशिल्ड लस (Covishield Vaccine) मिळेल अशी अपेक्षा करत आहे.

Pakistan PM Imran Khan (Photo Credits: IANS)

भारतात कोरोना व्हायरसवरील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तर राज्यातील विविध ठिकाणी टप्प्याटप्प्याने लसीकरणाची मोहिम राबवली जात आहे. अशातच आता पाकिस्तान (Pakistan)भारताकडून त्यांना कोविशिल्ड  लस (Covishield  Vaccine) मिळेल अशी अपेक्षा करत आहे. तत्पूर्वी पाकिस्तानच्या ड्रग रेग्युलेटरी अथॉरिटीकडून ऑक्सफर्ड एस्ट्राजेनेका यांच्या कोविड19 च्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे. पाकिस्तानने जरी या लसीच्या वापरासाठी मान्यता दिलीय पण एस्ट्राजेनेका वॅक्सिन ही भारतातील सीरम इंस्टिट्युट मध्ये तयार केली जात आहे. त्याचसोबत पाकिस्तानला ही लस द्विपक्षीय करारानुसार थेट मिळू शकणार नाही आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान जागतिक आरोग्य संगठनेच्या कोवॅक्स व्यवस्थेअंतर्गत भारतात तयार करण्यात येणारी लस मिळवू शकतो. या व्यतिरिक्त पाकिस्तान पुढील आठवड्यात चीनच्या सिनौफार्मा लसीला सुद्धा परवानगी देऊ शकतो. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या आरोग्या विषयावरील विशेष सहाय्यक डॉ. फैसल सुल्तान यांनी असे म्हटले की, आम्ही एस्ट्राजेनेका लसीला मंजूरी दिली आहे. कारण याचा 90 टक्के प्रभाव होतो. त्यामुळे याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी अन्य पर्यायांचा विचार करत आहोत. ड्रॅपच्या मंजूरी नंतर आम्ही कोवॅक्स अंतर्गत लस मिळवू शकतो.(Sinopharm Vaccine: पाकिस्तानने दिली चीनची कोरोना विषाणू लस 'सिनोफार्म'ला मंजुरी; Most Unsafe सह 73 दुष्परिणाम दिसल्याचा केला आहे दावा)

तर डॉ. फैसल यांना भारतातून लसीच्या आयातीसंदर्भात प्रश्न विचारला असता तर त्यांनी असे म्हटले की, बंदी असली तरीही जीव वाचवणाऱ्या औषधांची आयात केली जाऊ शकते. पण ही खरी गोष्ट आहे की, ज्या देशात लसीचे उत्पादन होत आहे तेथील लोकांना प्रथम लस द्यावी. मात्र आम्ही लस मिळवण्यासाठी प्रयत्न करु. या व्यतिरिक्त आम्ही सिनोफार्मासह अन्य काही लसीचे रजिस्ट्रेशन करणार आहोत. आमची लोकसंख्या अधिक असल्याने आम्ही चीनसह अन्य देशांची लस घेण्याचा विचार करत असल्याचे ही फैसल यांनी म्हटले.