Pakistan: पिझ्झाच्या ऑर्डरप्रमाणे पाकिस्तानात AK-47 ची केली जाते होम डिलिव्हरी

व्यक्तीला इंटरनेटवर आपल्या आवडीचे हत्यार निवडून ते ऑर्डर करण्यासाठी डिलरला फोन करावा लागतो.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

Pakistan: आपण ज्या प्रमाणे घरबसल्या पिझ्झाची ऑर्डर देतो त्याच पद्धतीने पाकिस्तानात चक्क बंदुकांसह एके-47 ची होम डिलिव्हरी अगदी सहज केली जाते. व्यक्तीला इंटरनेटवर आपल्या आवडीचे हत्यार निवडून ते ऑर्डर करण्यासाठी डिलरला फोन करावा लागतो. हत्याराची किंमत देणे शक्य असेल तर पुढील काही दिवसात ते तुमच्या घरी त्याचे पार्सल येते. पाकिस्तानातील समा टीव्हीच्या अनुसार हत्यारांची ही डिलिव्हरी संपूर्ण देशात केली जाते.(Corruption Perception Index: डेन्मार्क ठरला सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला देश; पाकिस्तान 140, तर बांगलादेश 147 व्या स्थानावर, जाणून घ्या भारताची स्थिती)

तुम्हाला वाटत असेल हत्यारांची ही डिलिव्हरी चोरीछुप्या पद्धतीने केली जात असेल तर ते खोटे आहे. कारण येथे हत्यारांची होम डिलिव्हरी ही खुलेआम केली जाते. एके-47 सारख्या घातक हत्यारांसाठी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर ग्रुप आहेत. याचा वापर सार्वजनिक रुपात केला जातो. घरीच हत्यारांची ऑर्डर करणाऱ्या एका व्यक्तीने समा टीव्हीशी बोलताना असे म्हटले की, हत्यार हे जहाजाच्या माध्यमातून खैबर पख्तूनवा मधील दारा अदमखेल येथून कराचीत आले आहे. यासाठी त्याने 38 हजार रुपये दिले आहेत.(Abu Dhabi Airport Attack: अबुधाबी विमानतळावर 3 ऑईल टॅंकर्सच्या आगीमागे ड्रोन हल्ल्याची शक्यता; Houthi ने स्वीकारली जबाबदारी Watch Video)

त्याने पुढे असे म्हटले की, हत्यारांची डिलिव्हरी करताना त्याच्याकडे त्याचा परवाना आहे की नाही ते सुद्धा विचारण्यात आले नाही. ही डील पूर्णपणे फोनवरच झाली होती. त्याने ईजी पैशांच्याद्वारे अॅडवान्स म्हणून आधी दहा हजार रुपये दिले होते. तर उर्वरित 28 हजार हे हत्यार मिळाल्यानंतर दिले. कराची मध्ये एके-47 हे सर्वाधिक मिळणारे हत्यार आहे. तसेच दोन वेगवेगळे नेटवर्क सुद्धा असून त्यात प्रथम हत्यारांची डील होते आणि दुसरा म्हणजे पुरवठा करणे.