Pulwama Terrorist Attack: पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये आमचा संबंध नाही, पाकिस्तान सरकारकडून निषेध

तर या भ्याड हल्ल्यात 44 जवान शहीद झाले आहेत. मात्र पाकिस्तानचा(Pakistan) यामध्ये हात असल्याचे सर्वत्र म्हटले जात आहे.

Pakistan's Prime Minster Imran Khan (Photo Credits-Twitter)

Pulwama Terrorist Attack: जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) येथील पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. तर या भ्याड हल्ल्यात 44 जवान शहीद झाले आहेत. मात्र पाकिस्तानचा(Pakistan) यामध्ये हात असल्याचे सर्वत्र म्हटले जात आहे. परंतु पाकिस्तान सरकारने यावर उत्तर देत असे म्हटले आहे की, भारतीय मीडिया आणि भारत सरकारने काही तत्वांच्या अभावी या दहशतवादी हल्ल्याचा संबंध पाकिस्तानशी जोडण्याचा प्रयत्न करु नये.

गुरुवारी (14 फेब्रुवारी) रात्री उशिरा पाकिस्तान सरकारने एका निवेदनाद्वारे पुलवामा (Pulwama) येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. दहशतवाद्यांनी केलेला हा हल्ला चिंताजनक असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. मात्र जगात कुठेही आणि कोणताही हिंसा झाल्यास प्रथम पाकिस्तानवर निशाणा साधला जात असल्याचे पाकिस्तान सरकारने या निवेदनाद्वार म्हटले आहे. तर राजनाथ सिंह यांनी जैश-ए-मोहम्मद यांनी हा दहशतवादी हल्ला घडवून आणला असून मसूद अझहरच्या नेतृत्वाखाली दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप राजनाथ सिंह यांनी केला. परंतु पाकिस्तानच्या सरकारने हा आरोप नाकारला आहे.(हेही वाचा-Pulwama Terrorist Attack: भारताचा पाकिस्तानला मोठा दणका, 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढून घेतला)

पाकिस्तान येथे असलेल्या 'जैश-ए-महम्मद' यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. तसेच हल्ला करण्यापूर्वी संघटनेने आत्मघाती हल्ला करण्यापूर्वी एक व्हिडिओ शूट केला होता. तर दहशतवादी संघटनेचा कमांडर आदिल अहमद डार हा यामधील आत्मघाती हल्लेखोर असल्याचे संघटनेने सांगितले आहे.