OMG: सेक्स करताना फ्रॅक्चर झाला पुरुषाचा Private Part; लघवी थांबली, रक्तस्त्राव सुरु झाला, उद्भवली Eggplant Deformity ची समस्या

यामुळेच लिंगाला फ्रॅक्चर होते. हेमॅटोमामुळे लिंगाचा रंग काळा होऊन तो मध्यभागी फुगतो, म्हणून त्याला एग्प्लान्ट डिफॉर्मिटी असे नाव दिले आहे.

For representational purposes only (Picture Courtesy: Pexels)

जगातील सर्वात आनंददायी गोष्टींपैकी एक मानली जाणारी गोष्ट म्हणजे 'सेक्स' (Sex), ही एका व्यक्तीसाठी शिक्षा ठरली आहे. होय, इंडोनेशियातील एका 50 वर्षीय पुरुषासाठी सेक्स हे दुःस्वप्न ठरले आहे. या माणसाला सेक्स करताना अत्यंत दुर्मिळ असे ‘लिंग फ्रॅक्चर’ (Penis Fracture) झाले. उपचारादरम्यान डॉक्टरांना या व्यक्तीला ‘Eggplant Deformity’ झाल्याचे समजले. हा एक अत्यंत दुर्मिळ आजार असून, सेक्स करताना जेव्हा लिंग फ्रॅक्चर झाल्यासारखे होते, तेव्हा हा आजार होते.

इंटरनॅशनल जर्नल ऑफ सर्जरी केस रिपोर्ट्समध्ये प्रकाशित झालेल्या एका पेपरमध्ये, ज्या डॉक्टरांनी या समस्येचे निदान केले त्यांनी या व्यक्तीला झालेला अपघात आणि तो पूर्ण बरे होण्यासाठी त्याच्यावर कसे उपचार केले याचे तपशीलवार वर्णन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीसोबत सेक्स करताना एका 50 वर्षीय पुरुषाचा प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर झाला. यादरम्यान तो वेदनेने ओरडू लागला. फ्रॅक्चरमुळे रक्तस्त्राव सुरू झाला आणि लघवीही थांबली. या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

रिपोर्ट्समध्ये डॉक्टरांनी सांगितले की, पेशंटला त्याच्या जोडीदारासोबत सेक्स करताना लिंगामध्ये क्रॅक जाणवल्या. जेव्हा डॉक्टरांनी पुरुषाच्या लिंगाची तपासणी केली तेव्हा त्यांना पुरुषाच्या लिंगामध्ये रक्ताची गुठळी आढळली, जी लिंगाच्या वरच्या टोकापासून त्याच्या अंडकोषापर्यंत गेली होती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टच्या आसपासच्या ऊती, रक्तवाहिन्या आणि नसा खराब झाल्या होत्या. मात्र, डॉक्टरांनी त्याच्यावर अत्यंत सावधगिरीने उपचार केले.

रुग्णालयात पाच दिवस घालवल्यानंतर तो माणूस बरा झाला. चार महिन्यांच्या उपचारानंतर या व्यक्तीला कोणतीही गंभीर समस्या उद्भवली नाही. आता तो पूर्वीप्रमाणेच जीवन जगत आहे. डॉक्टरांनी सांगितले की, पेनाईल फ्रॅक्चर (पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फ्रॅक्चर) ही एक असामान्य गोष्ट आहे, परंतु अशी काही प्रकरणे समोर येत आहेत. अशा परिस्थितीत गुंतागुंत टाळण्यासाठी 'लवकरात लवकर' शस्त्रक्रिया करावी. (हेही वाचा: Man Dies During Sex: रोमँटिक डिनरनंतर जोडप्याचा सुटला ताबा; सेक्स करताना पुरुषाचा मृत्यू, खिशात सापडली 'ही' गोष्ट)

याबाबत डॉ. गुलाटी म्हणतात की, एग्प्लान्ट डिफॉर्मिटी ही लिंगाची सूज आहे, जी लिंग जबरदस्तीने वाकल्यामुळे उद्भवते, ज्यामुळे कॉर्पोरा कॅव्हर्नोसा मोडतो. यामुळेच लिंगाला फ्रॅक्चर होते. हेमॅटोमामुळे लिंगाचा रंग काळा होऊन तो मध्यभागी फुगतो, म्हणून त्याला एग्प्लान्ट डिफॉर्मिटी असे नाव दिले आहे. डेली मेलच्या अहवालानुसार, 1924 पासून आतापर्यंत जगभरात पेनाईल फ्रॅक्चरची 2000 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. म्हणजेच दरवर्षी सुमारे अशा 16 घटना घडतात. बर्‍याच वेळा, पेनाईल फ्रॅक्चर झाल्यानंतर, रुग्ण इरेक्टाइल डिसफंक्शनशी संबंधित समस्यांना देखील बळी पडतो.