ब्रिटनच्या 50 पौंडच्या नोटेवर भारतीय वंशाची गुप्तहेर नूर इनायत खान झळकण्याची शक्यता

दुसर्‍या महायुद्धात त्यांनी ब्रिटिशांसाठी गुप्तहेर म्हणून काम केलं होतं.

नूर इनायत खान Photo Credits : Twitter

सध्या ब्रिटनमध्ये नूर इनायत खान या भारतीय वंशाच्या महिलेच्या नावाची सर्वत्र चर्चा आहे. ब्रिक्झेटनंतर 2020 साली ब्रिटीश चलनात 50 पौंडची नोट येणार आहे. ही नोट सर्वाधिक रक्कमेची नोट असणार आहे. त्यामुळे या ब्रिटिश चलनावर नेमका कोणाचा फोटो असावा ? यासाठी सध्या ब्रिटनमध्ये चर्चा सुरू आहे. नूर इनायत खान हे त्यापैकी एक नाव आहे.

कोण होत्या नूर इनायत खान ?

नूर इनायत खान यांचा प्रवास राजकन्या ते गुप्तहेर असा झाला आहे. टिपू सुलतानच्या वंशातील नूर यांचे वडील भारतीय तर आई अमेरिकन होती. दुसर्‍या महायुद्धात त्यांनी ब्रिटिशांसाठी गुप्तहेर म्हणून काम केलं होतं. नूरचं बालपण पॅरिसमधील मात्र दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जर्मनीने पॅरिसचा ताबा मिळावला आणि खान कुटुंबीय लंडनमध्ये स्थलांतरित झाले.

लंडनहून नूर इनायत खान या पॅरिसला रेडिओ ऑपरेटर म्हणून जाणार्‍या पहिल्या महिला होत्या. तेथेच मॅडेलेइन या नावाने सुमारे 3 महिने त्यांनी काम केले. त्यांनी जर्मनी आणि हिटलरच्या विरोधात ब्रिटनसाठी हेरगिरी गेली. अंतिम श्वासापर्यंत त्यांनी ब्रिटनसाठी काम केले. गोळ्या घालून नूर यांची अमानुष हत्या करण्यात आली.

नूरसाठी ऑनलाईन पिटिशन 

नूर इनायत खानसोबत अजून 4 जणांची नावं चर्चेत आहेत. यामध्ये मार्गारेट थेचर, स्टिफन हॉकिंग्स यांचाही समावेश आहे.

२०१४ साली ब्रिटनच्या 'रॉयल मेल'ने नूर इनायत खान यांच्यावर टपाल तिकीट सुरू केलं. ब्रिटनने 'जॉर्ज क्रॉस' या सर्वोच्च सन्मानाने नूरचा गौरव केला आहे. लवकरच राधिका आपटे नूर इनायत खान या गुप्तहेर राजकन्येच्या भूमिकेत दिसणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif