Nirav Modi Extradition Case: नीरव मोदी याचे चांगले दिवस संपले? भारतात प्रत्यार्पणासाठी लंडन मधील कोर्टाकडून कारवाईला सुरुवात

नीरव मोदी (Photo Credit-Twitter @The Telegraph)

भारतात पीएनबी बँकेत घोटाळा करुन परदेशात पळून जात तेथे स्थाईक झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी (Nirav Modi) याच्या भारतातील प्रत्यार्पणासाठीची कारवाई लंडनच्या कोर्टात सुरु झाली आहे. वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात या प्रकरणी सुनावणी पुढील पाच दिवस सुरु राहणार आहे. असे सांगितले जात आहे की, या दरम्यान नीरव मोदी याचे भारतात प्रत्यार्पण कधी होईल हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तसेच नीरव मोदी याच्या वकीलांनी मीडियाला या प्रकरणाचे कव्हरेज करण्यापासून दूर ठेवावे असा कोर्टाकडे आग्रह केला आहे.

नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेला जवळजवळ दोन अरब डॉलरचा चुना लावला. या प्रकरणी भारतातील विविध तपास यंत्रणेकडून गुन्हे दाखल केले आहेत. तसेच नीरव मोदी याचा साथीदार मेहुल चोक्सी भारतात इच्छित आहे. ब्रिटेनच्या क्राउन अभियोजन सेवा (सीपीएस) च्या माध्यमातून भारत या इच्छित आरोपीच्या प्रत्यार्पणाची मागणी करत आहे.(Nirav Modi Assets Confiscated: नीरव मोदी याची 326.99 कोटी रुपयांची संपत्ती जप्त; मुंबई, अलीबागसह जैसलमेर येथील पवन चक्की, लंडन येथील फ्लॅटचाही समावेश)

गेल्या वर्षात मार्च महिन्यात अटक झाल्यानंतर नीरव मोदी सध्या दक्षिण लंडन स्थित वांड्सवर्थ तुरुंगात कैद आहे. तो तुरुंगातूनच व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या कारवाईला सामोरे जात आहे. ब्रिटेन येथे सुद्धा कोरोना व्हायरसमुळे कोर्टाकडून करण्यात येणारी कारवाई व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून केली जात आहे.(व्हिडिओ: स्फोटकांनीही टेकले हात; नीरव मोदी याचा बंगला खचला परंतू पडला नाही)

पाच दिवस चालवाणारी कारवाई शुक्रवारी पूर्ण होण्याची शक्यता आहे. न्यायाधीश गूजी यांनी मे मध्ये प्रत्यार्पणच्या पहिल्या टप्प्यातील सुनाणीच्या अध्यक्षता केली होती. त्यावेळी सीपीएसने मोदीच्या विरोधात फसवणूकीचा आणि पैशाच्या लिलावाचा प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, नीरव मोदी याने पीएनबी बँकेत जवळजवळ 14,000 करोड रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. भारतात नीरव मोदी याच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif