Internet Outage: आंतरराष्ट्रीय संकेतस्थळांना Error; इंटरनेटवर NY Times, BBC, CNN, Reddit यांसह अनेक साईट्स उघडताना अडथळा

त्यामुळे जगभरातील व्हर्च्युअल विश्वात एक मोठाच गदारोळ निर्माण झाला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार प्रामुख्याने न्यूयॉर्क टाइम्स (NYT) , सीएनएन (CNN) यांसारख्या संकेतस्थळांसह इतर अनेक आंतरराष्ट्रीय वृत्त देणारी संकेतस्थळं आणि इतरही काही वेबसाईट्स, पोर्टल्स डाऊन झाली आहेत.

Internet | Photo Credits: Pixabay.com)

जगभरातील इंटरनेट सेवा मोठ्या प्रमाणावर ठप्प (Internet Outage) झाली आहे. त्यामुळे जगभरातील व्हर्च्युअल विश्वात एक मोठाच गदारोळ निर्माण झाला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार प्रामुख्याने न्यूयॉर्क टाइम्स (NYT) , सीएनएन (CNN) यांसारख्या संकेतस्थळांसह इतर अनेक आंतरराष्ट्रीय वृत्त देणारी संकेतस्थळं आणि इतरही काही वेबसाईट्स, पोर्टल्स डाऊन झाली आहेत. प्राथमिक अहवालामध्ये सांगण्यात येते आहे की, प्रायव्हेट सीडीएन (Content Delivery Network) मध्ये अनेक अडथळे आल्याने हा प्रकार घडला. एकाच वेळी जगभरात समस्या निर्माण करणाऱ्या या प्रकाराबद्दल माहिती घेण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, अनेक प्रसिद्ध अशी संकेतस्थळं ठप्प झाली आहेत. यात रेडिट, स्पॉटिफाई, पेपल, शॉपिफाई आदी संकेतस्थळांचाही समावेश आहे. गार्डियन(Guardian) , न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी आणि फाइनेंशियल टाइम्स यांसारख्या संकेतस्थळांनाही इंटरनेट समस्येचा सामना करावा लागतो आहे. Content Delivery Network मध्ये अडथळा निर्माण झाल्याने ही समस्या उद्भवल्याचे सांगितले जात आहे.

सीईएन म्हणजेच कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क्स ला इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चरचा पाया मानला जातो. फास्टली सारख्या कंपन्या सर्वर चे ग्लोबल नेटवर्कच्या माध्यमातून आपल्या सेवांना उत्कृष्ठ बनविण्याचा आणि ठेवण्याचा प्रयत्न करतात. विशेषत: मीडिया कंटेंट आपल्या स्थानिक सीडीएन सर्व्हर द्वारा इकत्र केले जाते ज्यामुळे प्रत्येक वेळी वेब बेज लोड करण्यासाठी एका मूळ सर्व्हरपर्यंत जाण्याची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे वेब पेज कमी वेळात लोड होते. तसेच संकेतस्थळावर प्रचंड ट्रॅफीक आले तरीही ते क्रॅश होण्याचा धोका प्रचंड प्रमाणात कमी होतो.

एएफपी ट्विट

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार अमेजन(Amazon) , रेडिट (Reddit), Pinterest आणि ट्विटच (Twitch) यांसारख्या बड्या वेबसाईट्स (संकेतस्थळ) काम करत नव्हत्या. इंग्लंड सरकारची वेबसाई gov.uk सुदधा ठप्प झाली. ज्या संकेतस्थळांना अधिक समस्यांचा सामना करावा लागला त्यांच्या पेजवर 'Error 503 Service Unavailable' असा संदेश दिसत होता. फास्टलीने म्हटले आहे की, ग्लोबल कंटेंट डिलिव्हरी नेटवर्कमध्ये आलेल्या समस्येमुळे ही समस्या निर्माण झाली.  (हेही वाचा, देशातील 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 60 टक्के पेक्षा जास्त महिलांनी कधीही इंटरनेट वापरले नाही- Survey)

Fastly ने आपल्या स्टेटस पेजवर म्हटले आहे की काही वेबसाईट्स हळूहळू पूर्वपदावरयेत आहेत. निर्माण झालेली समस्या आम्ही बऱ्यापैकी सोडवली आहे. आणखीही ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लवकरच सर्व स्थिती पूर्वपदावर येईल.

एएनआय ट्विट

ट्विट

ट्विट

ट्विट

दरम्यान, इंटरनेट आऊटेड झाल्याने संकेतस्थळ ठप्प होत असल्याचे पुढे येताच, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडू लागला. ट्विटर, फेसबुक आणि इतर अनेक माध्यमांतून यूजर्सनी अनेक मिम्स शेअर केले.