Monkeypox: मनुष्य प्राण्याकडून कुत्र्याला मंकीपॉक्स संसर्ग, जगातील पहिलीच घटना; WHO म्हणते 'चिंतेचे कारण नाही

या वाढत्या संसर्गासोबतच ज्या बातम्या येत आहेत त्या आश्चर्यकारक आहेत. आजवर आपण प्राण्यांकडून मानावला विविध आजाराचे संसर्ग झाल्याचे पाहिले आहे. अशा प्रकारचे वृत्त नेहमीच पाहायला मिळते. पण, जगात प्रथमच मनुष्य प्राण्याकडून (Humans) कुत्र्याला (Dog) मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्याची घटना घडली आहे.

Dog | Representational Picture (Photo Credits: Pixabay)

मंकीपॉक्स (Monkeypox) संसर्गाचा धोका जगभरात वाढतो आहे. या वाढत्या संसर्गासोबतच ज्या बातम्या येत आहेत त्या आश्चर्यकारक आहेत. आजवर आपण प्राण्यांकडून मानावला विविध आजाराचे संसर्ग झाल्याचे पाहिले आहे. अशा प्रकारचे वृत्त नेहमीच पाहायला मिळते. पण, जगात प्रथमच मनुष्य प्राण्याकडून (Humans) कुत्र्याला (Dog) मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्याची घटना घडली आहे. होय, मानवाकडून कुत्र्याला मंकीपॉक्स संसर्ग झाला आहे. त्या कुत्र्यामध्ये मंकीपॉक्सची लक्षणे दिसू लागली आहेत. जगभरातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे.

लाइवसाइंस.कॉमने दिलेल्या वृत्तानुसार जागतिक आरोग्य संघटनेच्या रोजमंड लेविस यांनी वॉशिंग्टन पोस्टसोबत बोलताना म्हटले आहे की, जगभरात असे पहिलेच उदाहरण आहे. ज्यात मानवाकडून प्राण्याला मंकीपॉक्स संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. ही एक नवी माहिती आहे. परंतू, ही तितकी चिंता करावी इतकी ही मोठी घटना नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. (हेही वाचा, Dog Rape: भटक्या कुत्र्यांवर बलात्कार करणारा 'बाबुराव' पोलिसांच्या ताब्यात)

मंकीपॉक्स हा सर्वसाधारणपणे मनुष्य प्राण्यामध्ये आढळणारा आजार आहे. ज्याची लागण झाल्यास संबंधित रुग्णाच्या शरीरावर, फोड, व्रण दिसू लागतात. शिवाय हा संसर्गजन्य आजार असल्याने संपर्कात असलेल्या व्यक्तीलाही याची लागण होते. प्रामुख्याने मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंधाच्या माध्यमातून संपर्कात आल्यास हा आजार अधिक पसरतो असे अभ्यास सांगतो.

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार फ्रान्सची राजधानी पॅरीसमध्ये एका पाळीव कुत्र्यामध्ये मंकीपॉक्सची लक्षणे दिसू लागली. हा कुत्रा मंकीपॉक्सची लागण झालेल्या दोन व्यक्तींसोबत राहात असल्याचे सांगितले जात आहे. या तिघांमध्येही पुढे मंकीपॉक्सची लक्षणे दिसू लागली. यातील दोन्ही व्यक्ती एकमेकांसोबत शारीरिक संबंध ठेवत. दोघेही जून 2022 मध्ये पॅरीस येथे मंकीपॉक्स संक्रमीत झाल्याचे आढळून आले. द लेन्सेट जर्नलमध्ये पाठिमागच्याच आठवड्यात एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला. त्यानुसार दोन व्यक्तींमध्ये लक्षणे दिसू लागल्यावर 12 दिवसानंतर त्यांच्या 4 वर्षांच्या इटालीयन ग्रेहाउंड कुत्र्यातही मंकीपॉक्सची लक्षणे दिसू लागली.