Moderna त्यांच्या COVID-19 vaccine साठी प्रत्येक डोस मागे आकारणार 1855-2755 रूपये; CEO ची माहिती
Moderna ने अंतरिम अहवालानुसार, त्यांची लस 94.5% प्रभावी असल्याचा दावा केल्यानंतर आता CEO, Stephane Bancel यांनी शनिवारी (21 नोव्हेंबर) कंपनी सरकारला प्रति डोस साठी USD 25-37आकारणार असल्याचं सांगितले आहे.
जगाचं लक्ष सध्या कोविड 19 आजाराला रोखण्यासाठी त्याच्यावर संशोधन सुरू असणार्या लसींवर लागलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच Moderna ने अंतरिम अहवालानुसार, त्यांची लस 94.5% प्रभावी असल्याचा दावा केल्यानंतर आता The Chief Executive of Moderna, Stephane Bancel यांनी शनिवारी (21 नोव्हेंबर) कंपनी सरकारला प्रति डोस साठी USD 25-37आकारणार असल्याचं सांगितले आहे. दरम्यान भारतीय रूपयामध्ये ही किंमत प्रति डोस 1855-2755 रूपये आहे. नक्की वाचा: COVID19 वरील वॅक्सीन 94.5 टक्के प्रभावी, अमेरिकेतील Moderna Inc कंपनीचा दावा.
German weekly Welt am Sonntag (WamS)सोबत बोलताना Stephane Bancel यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना वायरस वॅक्सिनची किंमत ही सरकार किती डोसची ऑर्डर देत आहे यावर अवलंबून असेल. पण सध्या फ्लूच्या शॉट इतकी म्हणजे 10-50 अमेरिकन डॉलरमध्येच त्याची किंमत असेल असे सांगितले आहे.
काही महिन्यांपूर्वी Senior EU Official यांनी मॉर्डना सोबत बोलताना मिलियन डोसेस घेण्याचा करार करण्याचा विचार सुरू असल्याचं म्हटलं होतं. त्यासाठी मॉर्डनाच्या डोसची किंमत ही $25 पेक्षा कमी ठेवल्याची माहिती होती. अद्याप कोणत्याही करारावर स्वाक्षर्या झालेल्या नाहीत मात्र युरोपासोबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
अमेरिकेमध्ये Moderna च्या पूर्वी Pfizer ने देखील त्यांची लस 95% प्रभावी असल्याची माहिती दिली होती. जुलै महिन्यापासूनच EU आणि Moderna मध्ये लसीबाबत चर्चा सुरू आहे. Moderna देखील mRna वॅक्सिन आहे.