विजेचा झटका ( फोटो सौजन्य - फेसबुक )

प्रत्येक समाजात लग्नासंबंधित विविध परंपरा- रुढी यांचा विचार करुन लग्नच्या विधी पार पाडल्या जातात. तर काही समाजात मॉर्डन पद्धतीने विवाह केला जातो. तर काही समाजात अजून ही परंपरेनुसार चालत आलेल्या प्रथेचा पाठपुरावा करत त्याचे पालन करावे लागते. अशाच एका परंपरेनुसार पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी चक्क पुरुष मंडळींना विजेचा 120 व्होल्टचा झटका दिला जातो.

पाश्चिमात्य देशांमध्ये अनेक ठिकाणी मुलीच्या लग्नासाठी स्वयंवराचे आयोजन केले जाते. तसेच या स्वयंवरामध्ये सहभागी होणाऱ्या नवरदेवांना त्यांचा पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करुन तो सिद्ध करावा लागतो. तसेच बोहल्यावर चढण्यापूर्वी त्याला आधी दारु पिण्यास सांगितले जाते आणि नंतर त्याला विजेचा 120 व्होल्टचा झटका देतात. या विजेच्या झटक्याची क्षमता ज्या व्यक्तीमध्ये आहे त्याला 'खरा मर्द' असे तेथे संबोधले जाते. त्यानंतर मुलीच्या घरातील मंडळी त्या मुलाशी लग्न करायचे की नाही हे ठरवितात.

त्यामुळे जर तुम्ही कोणत्या पाश्चिमात्य तरुणीशी लग्न करायचे ठरवत असाल तर हे नक्की लक्षात ठेवा. नाही तर तुम्हाला सुद्धा पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी 120 व्होल्टचा झटका दिला जाईल.