Man Flown 23 Million Miles: विमान कंपनीचे निघाले दिवाळे; व्यक्तीने एकदाच पैसे भरून केला केला तब्बल 2 कोटी 30 लाख मैल प्रवास; पत्नीसह 100 देशांमध्ये हनिमून, जाणून घ्या सविस्तर

यावेळी त्यांनी 365 दिवसांत सुमारे 1.5 दशलक्ष मैलांचा प्रवास केला. जर टॉम यांना आत्ता या सर्व फ्लाइट्सची तिकिटे विकत घ्यायची असती, तर त्यांना त्यासाठी 24.4 कोटी रुपये खर्च करावे लागले असते.

Flight Representational image. (Photo Credits: Pexels)

अमेरिकेतील रहिवासी असलेल्या टॉम स्टकर (Tom Stuker) व्यक्तीच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे आणि त्यांचा हा विक्रम क्वचितच कोणी मोडू शकेल. तर स्टकर हे जगातील सर्वाधिक प्रवास करणाते व्यक्ती ठरले आहेत. आतापर्यंत त्यांनी तब्बल 2 कोटी 30 लाख मैलांचे अंतर विमानाने कापले आहे. स्टकर यांनी 100 देशांमध्ये 120 वेळा पत्नीसोबत हनीमून साजरा केला आहे. आता तुम्ही विचार करत असाल की यासाठी त्यांना विमान तिकिटांवर खूप पैसे खर्च करावे लागले असतील. पण तसे नाही.

तर, याआधी 1990 मध्ये, स्टकर यांनी 2 कोटी 37 लाखांना युनायटेड एअरलाइन्स ऑफ अमेरिकाचा लाइफ टाइम पास विकत घेतला. या पासच्या मदतीने ते आयुष्यभर मोफत प्रवास करू शकतात. परंतु या ऑफरचा एवढा मोठा फायदा कोणी घेईल हे कदाचित तेव्हा एअरलाइन्सना वाटलेही नसेल. या पासच्या मदतीने टॉम यांनी 23 दशलक्ष मैल विमान प्रवास केला आहे. आता युनायटेड एअरलाइन्सने लाईफ टाइम पास देणे बंद केले आहे. इतक्या वेळा प्रवास केल्यानंतर, युनायटेड एअरलाइन्सचे जवळजवळ सर्व कर्मचारी 69-वर्षीय टॉम स्टकर यांना ओळखू लागले आहेत.

टॉम स्टकर हे अमेरिकेतील न्यू जर्सी येथे राहतात, जिथे ते कार डीलरशिप सल्लागार म्हणून काम करतात. टॉम यांचा विस्तृत प्रवास अनुभव पाहता, एअरलाइन्सने त्यांच्या नव्याने उघडलेल्या एका क्लबमधील मेनू तयार करण्यासाठी टॉम यांची मदत घेतली होती. टॉम स्टकर यांच्या मते 1990 मध्ये विकत घेतलेला लाइफ टाईम पास हा त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम गुंतवणूक आहे. (हेही वाचा: प्रसिद्ध झाली जगातील सर्वात लोकप्रिय रेस्टॉरंट्सची यादी; भारतातील 7 ठिकाणांचा समावेश, घ्या जाणून)

वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, 2019 मध्ये, टॉम स्टुकर यांनी 373 उड्डाणे केली. यावेळी त्यांनी 365 दिवसांत सुमारे 1.5 दशलक्ष मैलांचा प्रवास केला. जर टॉम यांना आत्ता या सर्व फ्लाइट्सची तिकिटे विकत घ्यायची असती, तर त्यांना त्यासाठी 24.4 कोटी रुपये खर्च करावे लागले असते. टॉम यांनी सलग 12 दिवस हवाई प्रवास केला आहे. या 12 दिवसात ते एकतर आकाशात किंवा एअरपोर्ट लाउंजमध्ये दिसले गेले. या 12 दिवसात ते विमानतळाच्या बाहेर आले नाहीत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif