विकृती: अपहरण करुन शेजाऱ्याच्या गर्भवती शेळीवर रात्रभर बलात्कार! प्रकृती गंभीर, नराधमाला अटक

पीडित बकरीवर उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे.

(संग्रहित, संपादित, प्रतिकात्मक प्रतिमा)

एक गर्भवती शेळी एका वासनांध नराधमाच्या विकृतीची बळी ठरल्याची अत्यंता धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फेसोलानी एमक्यूब असे या नराधमाचे नाव आहे. एमक्यूब याने त्याच्या शेजाऱ्याची काही महिन्यांच्या गर्भवती शेळीचे अपहरण केले. आणि तिच्यावर रात्रभर बलात्कार केला. या प्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरविले आहे. ही घटना दक्षिण अफ्रिकेतील प्रिटोरिया येथील असून, पोलिसांनी ३३ वर्षीय आरोपीस रंगेहात पकडले आहे. पीडित बकरीवर उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे.

क्युबातील पशुकल्याण विभागाच्या अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आपल्या जीवनातील आजवरची प्राण्यासोब झालेली ही सर्वात मोठी, दुर्दैवी आणि तितकीच धक्कादायक घटना मी पाहिली. आरोपीने अत्यंत अमानुषपणे शेळीसोबत गैरवर्तन केले. कायद्यानुसार त्याला कडक शिक्षा नक्कीच होईल. दरम्यान, शेळीच्या मालकाने जेव्हा शेळीची अवस्था पाहिली तेव्हा, त्यालाही मोठा धक्का बसल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, शेळीवर उपचार सुरु असून, तिची प्रकृती गंभीर असल्याचेही हा अधिकारी म्हणाले.

दरम्यान, 'सोसायटी फॉर प्रिवेन्शन ऑफ क्रुएलिटी टू अॅनिमल्स' येथे बकरीवर उपचार सुरु आहेत. बकरीची प्रकृती गंभीर असली तरी, त्यात सुधारणा होत असल्याचे येथील अधिकाऱ्याने म्हटले आहे. बकरीमालकाने स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले की, '९ ऑगस्टच्या रात्री सुमारे आठच्या सुमारास काहीसा विचित्र आवाज माझ्या कानावर पडला. पण, मी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. मला वाटले बकरी गर्भवती आहे. त्यामुळे तिला बाळंतकळा (लेबरपेन) येत असाव्यात. लवकरच ती बाळाला जन्म देईल. पण, दुसऱ्या दिवशी सकाळी मी पाहिले तर, बकरीच गायब होती. त्यानंतर मी तिचा खूप शोध घेतला पण ती मिळाली नाही.'(हेही वाचा, महिलाच नाही तर आता जनावरेही असुरक्षित; बकरीशी केले विकृत चाळे)

दरम्यान, पुढे बोलताना बकरीच्या मालकाने सांगितले की, 'खूप शोध घेतल्यावर बकरी क्यूब याच्या अंथुरणात सापडली. आपल्या कृत्याबद्दल क्युबने सुरुवातीला नकार दिला. मात्र, स्थानिक नागरिकांन त्याच्यावर दबाव टाकून विचारले असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसानी त्याला अटक केले. न्यायालयासमोर आरोपीला हजर केले असाता त्याला एक महिन्यांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.