Malaysia's New King's Wealth: तब्बल 300 गाड्या, खाजगी सैन्य, जेट आणि बरेच काही; जाणून घ्या मलेशियाचे नवे राजे Sultan Ibrahim Iskandar यांची डोळे दिपवणारी संपत्ती
जोहोरमधील कोट्यवधी डॉलरच्या फॉरेस्ट सिटी डेव्हलपमेंट प्रकल्पातही त्यांचा मोठा वाटा आहे. सिंगापूरसोबत हाय-स्पीड रेल्वे लिंक प्रकल्पात त्यांचा सहभाग आहे. याशिवाय U Mobile ची 24 टक्के भागीदारी आहे. सिंगापूरमध्ये त्यांच्याकडे 4 अब्ज डॉलर्सची जमीन आहे.
Malaysia's New King's Wealth: सुलतान इब्राहिम इस्कंदर (Sultan Ibrahim Iskandar) यांची मलेशियाचा (Malaysia) नवीन राजा म्हणून निवड करण्यात आली आहे. इब्राहिम इस्कंदर हे मलेशियातील जोहोर राज्याचे सुलतान बनले आहेत. या देशात नऊ वंशीय मलय राज्य शासक आहेत, ज्यांना दर पाच वर्षांनी राजाची भूमिका स्वीकारण्याची जबाबदारी दिली जाते. सुलतान इब्राहिम इस्कंदर यांनी जोहोर राज्याचे 17 वे राजे म्हणून शपथ घेतली आहे. मलेशियाची संघीय राजधानी क्वालालंपूर येथील नॅशनल पॅलेसमध्ये त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
आता सुलतान इब्राहिम इस्कंदर त्यांच्या मालमत्तेबाबत चर्चेत आले आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या राजाची संपत्ती 5.7 अब्ज डॉलर आहे. सुलतान इब्राहिमच्या संपत्तीमध्ये रिअल इस्टेट, खाणकाम ते दूरसंचार, पाम तेल यासारख्या अनेक उद्योगांचा समावेश आहे. त्यांच्याकडे 300 पेक्षा जास्त आलिशान गाड्या आहेत, ज्यात त्यांना ॲडॉल्फ हिटलरने भेट म्हणून दिलेल्या एका गाडीचा समावेश आहे. त्यांच्याकडे निळ्या रंगाचे बोईंग 737 सह खाजगी जेट देखील आहे. याशिवाय या राजघराण्याकडे खाजगी सैन्य देखील आहे.
जोहोरमधील कोट्यवधी डॉलरच्या फॉरेस्ट सिटी डेव्हलपमेंट प्रकल्पातही त्यांचा मोठा वाटा आहे. सिंगापूरसोबत हाय-स्पीड रेल्वे लिंक प्रकल्पात त्यांचा सहभाग आहे. याशिवाय U Mobile ची 24 टक्के भागीदारी आहे. सिंगापूरमध्ये त्यांच्याकडे 4 अब्ज डॉलर्सची जमीन आहे. त्यांच्या पत्नीचे नाव जरीथ सोफिया आहे. ती राजघराण्यातील आहे. ऑक्सफर्डमध्ये शिकलेली सोफिया ही व्यवसायाने लेखिका असून तिने मुलांसाठी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. सुलतान आणि सोफिया यांना पाच मुलगे आणि एक मुलगी आहे. (हेही वाचा: Cipher Case: पीटीआयचे संस्थापक इम्रान खान आणि शाह मेहमूद कुरेशी यांना सायफर प्रकरणात 10 वर्षांचा तुरुंगवास)
सुलतानचा मोठा मुलगा आणि मलेशियाचा क्राउन प्रिन्स टुंकू इस्माईल भारतीय सैन्यात कॅप्टन म्हणून कार्यरत आहे. सिंगापूरची न्यूज एजन्सी द स्ट्रेट्स टाइम्सच्या वृत्तानुसार, 2007 मध्ये टुंकू इस्माइल भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व करणारा पहिला परदेशी बनला होता. दरम्यान, मोठ्या राजकीय नियुक्त्या करण्याव्यतिरिक्त, मलेशियाचा राजा मुस्लिम-बहुल देशात इस्लामचा अधिकृत प्रमुख आणि त्याच्या सशस्त्र दलांचा कमांडर-इन-चीफ देखील आहे. मलेशियामध्ये 13 राज्ये आणि 9 राजघराणे आहेत. त्यांचे प्रमुख 9 राज्यांचे सुलतान आहेत, जे 5-5 वर्षांसाठी राजे बनतात. मलेशियामध्ये राजा बनण्याचा मार्ग आधीच ठरलेला आहे. असे असूनही, गुप्त मतदान होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)