L'oreal Products: सावधान! लोरिअलचे प्रॉडक्ट्स वापरल्या कर्करोग होण्याची संभावना? न्यायालयात याचिका दाखल

तरी तुम्ही लॉरिअलच्या प्रॉडक्ट्सचे वापरकर्ते असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे.

लोरिअल (L'oreal) हा एक कॉस्मेटीक क्षेत्रातील सुप्रसिध्द ब्राण्ड (Famous Brand) आहे. केसांसाठी ह्याचे विविध प्रॉडक्ट्स बाजारात उपलब्ध आहेत. हेअर शांम्पू (Shampoo), हेअर कंडीशनर (Hair Conditioner), हेअर कलर (Hair Colour) अशा विविध प्रॉडक्टसला बाजारात विशेष पसंती आहे. पण लॉरिअलचे प्रॉडक्ट्स (L'oreal Products) वापरल्यास कर्करोग (Cancer) होण्याची संभावना असल्याच्या चर्चांना आता उधान आलं आहे. तरी तुम्ही लॉरिअलच्या प्रॉडक्ट्सचे (L'oreal Products User) वापरकर्ते असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे. जेनी मिशेल (Jenny Mitchell) नावाच्या महिलेने लॉरिअल Loreal कंपनीवर आरोप केला आहे की, तिने दोन दशकांहून अधिक Lorealचे उत्पादनं (Products) वापरली होती, त्यानंतर तिला गर्भाशयाचा कर्करोग झाला ज्यामुळे तिला शस्त्रक्रिया गर्भाशय काढावं लागलं. तरी लोरिअलच्या वापरामुळे तिला कर्करोगाची लागण झाली असा आरोप या महिलेने लोरिअल कंपनीवर केला आहे.

 

एवढचं नाही तर जेनी मिशेल (Jenny Mitchell) हिने लोरिअल विरोधात कंपनीच्या केमिकल हेअर स्ट्रेटनिंग प्रोडक्ट्समुळे (Loreal Hair Straightening Products) कर्करोग झाल्याचा दावा करत अमेरिकेच्या (America) शिकागो (Chicago) येथील कोर्टात याचिका दाखल केली आहे. तरी या माहिलेने कोर्टात लॉरियल कंपनीवर नुकसानभरपाईची मागणी केली आहे. यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थ सेफ्टीच्या अभ्यासाचा संदर्भ देत महिलेने हा आरोप केला आहे. (हे ही वाचा:- Priyanka Chopra: आता न्यूयॉर्कमध्येही असणार शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या, अभिनेत्री प्रियंका चोप्रा म्हणते...)

 

याचिका दाखल केलेल्या महिला तब्बल २० वर्षांपासून अधिक कालावधी पासून लॉरिअलचे प्रॉडक्ट्स वापरत असल्याची माहिती दिली आहे. तर त्यानंतर तिला गर्भाशयाचा कर्करोग झाला आणि त्यानंतर तिला शस्त्रक्रिया गर्भाशय काढावं लागलं, असं स्पष्टीकरण या महिलेने दिलं आहे. तरी या याचिकेवर लोरिअल कंपनीकडून अजूनही कुठली प्रतिक्रीया देण्यात आलेले नाही पण आता कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर यावर काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.