प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

लंडन (London) येथील एका उच्च न्यायालयाने (High Court) पत्नीसोबत सेक्स करण्याचा पतीला मूलभूत अधिकार असल्याच्या निर्णयाची घोषणा केली आहे. न्यायाधीश एपी हेडन यांनी हा निर्णय दिला आहे. कोर्ट ऑफ प्रोटेक्शन मधील एका प्रकरणी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे हेडन यांनी म्हटले आहे.

सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, एका पत्नीने पतीसोबत सेक्स करण्यास नकार दिल्याने त्याने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. तसेच कनिष्ठ न्यायालयाने पत्नीच्या बाजूने निर्णय देत 20 वर्ष संबंध प्रस्थापित करण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतरच पतीने न्यायालयात धाव घेतली होती. तर उच्च न्यायालयाने पतीच्या बाजूने निर्णय देत पतीसोबत शारीरिक संबंध ठेवणे हा पतीचा मूलभूत अधिकार असल्याचे म्हटले आहे. तसेच मूलभूत अधिकारावर कोणत्याही प्रकारची बंदी आणता येत नाही.(हेही वाचा-महेश भट्ट यांच्या हत्येचा कट रचरणारा Abdul Rashid Radiowala अमेरिकेकडून भारताच्या हवाली)

तर लेबर पार्टीमधील खासदारांनी याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामध्ये त्यांनी असे म्हणले आहे की, ब्रिटनमधील व्यक्तीला त्याच्या पत्नीसोबत जबरदस्तीने सेक्स करण्याचा अधिकार नाही. त्यातच पतीने जबरदस्तीने पत्नीसोबत सेक्स करण्याचे ठरवल्यास तो बलात्कार असल्याचे मानले जाते. त्यामुळे पत्नीच्या विरोधात जाऊन पतीने सेक्स करणे अमान्य असल्याचे मत अनेक लोकांनी व्यक्त केले आहे.