Rishi Sunak vs Liz Truss: लिज ट्रस युकेच्या नव्या पंतप्रधान, भारतीय वंशाचे ऋषि सुनक यांचा पराभव

खास करुन भारतात. कारण भारतीय वंशाचे ऋषि सुनक (Rishi Sunak) हेसुद्धा पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत होते.

Rishi Sunak, Liz Truss | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

युकेचे (United Kingdom) पंतप्रधान बोरिस जॉनसन (Boris Johnson) पायउतार झाल्यानंतर पुढचे पंतप्रधान (Prime Minister of United Kingdom) कोण याबाबत जगभरात प्रचंड उत्सुकता होती. खास करुन भारतात. कारण भारतीय वंशाचे ऋषि सुनक (Rishi Sunak) हेसुद्धा पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत होते. दरम्यान, लिज ट्रस (Liz Truss) यांच्यासोबत झालेल्या लढतीत ऋषि सुनक (Rishi Sunak) मागे पडले आहेत. त्यामुळे ब्रिनटच्या पुढच्या पंतप्रधान लिज ट्रस (Liz Truss) याच असतील यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. ब्रिटीश प्रमाण वेळेनुसार रात्री 12.30 वाजता ही घोषणा करण्यात आली. लिज ट्रस यांनी ऋषी सुनक यांचा पराभव केला. (Liz Truss Defeats Rishi Sunak) परराष्ट्र मंत्री लिज ट्रस आणि त्यांचे प्रतिस्पर्धी ऋषी सनक कंजर्वेटीव्ह पक्षाचे प्रमुख पदासाठी नशिब आजमावत आहेत.

लिज ट्रस ब्रिटनच्या तीसऱ्या महिला पंतप्रधान असतील. त्यांच्या आधी थेरेसा मे, मार्गारेट थॅचर यांनी इंग्लंडचे पंतप्रधान पद भूषवले आहे. आता 47 वर्षांच्या लिज ट्रस निवडणुकीच्या आखाड्यात 42 वर्षीय ऋषी सनक यांचा पुढे असल्याचे सर्व्हेमध्ये सांगितले जात आहे. शेवटच्या टप्प्यात 200,000 टोरी सदस्यांनी निर्णायकी फैसला केला. (हेही वाचा, Prime Minister Of Britain: सोमवारी ब्रिटनला मिळणार नवे पंतप्रधान, कोण होणार पंतप्रधान लिझ ट्रस की ऋषी सुनक?)

कोणाला किती मते?

लिज ट्रस : 81,326

ऋषि सुनक : 60,399

एकूण मते : 172,437

झालेले मतदान : 82.6%

बाद मते : 654

बॉरिस जॉन्सन जुलै महिन्यात अनेक वादांमध्ये घेरल्यानंतर कंजर्व्हेटी पार्टीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. ब्रिटनमध्ये कंजर्व्हेटीव पार्टी सत्तेत आहे आणि सत्ताधारी पक्षाचे प्रमुखच पंतप्रधान पदाचे दावेदार असतात.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच पंतप्रधान कार्यालयात पोहोचले. त्यांनी थेरेसा मे यांच्याकडून पंतप्रधान पदाची सूत्रे घेतली होती. बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान म्हणून 1139 दिवस सत्ता सांभाळली. जॉन्सन यांनी मंगळवारी कंजर्व्हेटीव पक्षाच्या नव्या नेत्यासोबत सत्तेचे अधिकृत हस्तांतर करण्यासाठी महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांना भेटण्यासाठी बाल्मोरल येथे जातील.

दरम्यान, लिज ट्रस यांच्यासमोर अनेक आव्हाने असणार आहेत. दोन गटामध्ये विभागलेल्या कंजर्व्हेटीव पक्षाला पुन्हा एकत्र करणे हे त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हान असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पक्षातील सर्वाधिक खासदार हे ऋषी सुनक यांच्या बाजूचे आहेत. मात्र, पक्षाचे सदस्य हे ब्रिटीश राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर लिज ट्रस यांचे समर्थन करत आहेत. त्यामुळे ऋषी सनक यांना सोबत घेऊन कारभार करण्यावर लिज ट्रस यांना भर द्यावा लागणार आहेत.