Magic Durandal Sword Disappears: प्रख्यात ड्युरंडल तलवार फ्रेंच शहरातून रहस्यमयपणे गायब; 1,300 वर्षांहून अधिक काळ अडकली होती दगडात

ड्युरंडल तलवार (Durandal Sword) फ्रान्सच्या रोकामाडॉर (Rocamadour) शहरातून रहस्यमयरित्या गायब झाली आहे. अतिशय ऐतिहासिक अशी समजली जाणारी ही तरवाल पाठिमागील जवळपास 1300 वर्षांपासून दगडात अडकली होती. ड्युरंडल तलवार (Durandal Sword Disappears) फ्रेंच एक्सकॅलिबर म्हणून प्रसिद्ध आहे.

Durandal Sword | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

ड्युरंडल तलवार (Durandal Sword) फ्रान्सच्या रोकामाडॉर (Rocamadour) शहरातून रहस्यमयरित्या गायब झाली आहे. अतिशय ऐतिहासिक अशी समजली जाणारी ही तरवाल पाठिमागील जवळपास 1300 वर्षांपासून दगडात अडकली होती. ड्युरंडल तलवार (Durandal Sword Disappears) फ्रेंच एक्सकॅलिबर म्हणून प्रसिद्ध आहे. किंग आर्थरने दगडातून काढलेली तलवार ब्रिटनचा "खरा राजा" म्हणून संदर्भित करते. पौराणिक कथेनुसार, आठव्या शतकात एका देवदूताने पवित्र रोमन सम्राट शार्लेमेनला तलवार दिली, अशी अख्यायीका आहे. तलवार बेपत्ता होण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. या तलवारीची चोरी झाली असावी अशी शंका व्यक्त केली जात आहे.

1300 वर्षांपासून दगडात अडकली तलवार

जमिनीपासून सुमारे 100 फूट उंच दगडी भिंत फोडून चोराने ही तलवार बाहेर काढली आणि लंपास केली असवी अशी स्थानिकांना शंका असल्याचे वृत्त 'द टेलिग्राफ'ने दिले आहे. दरम्यान, 1300 वर्षांपासून दगडात अडकलेली तलवार चोरट्याने बाहेर काढली तरी कशी? असा सवाल उपस्थीत केला जात आहे. 11व्या शतकातील "द सॉन्ग ऑफ रोलँड" या कवितेमध्ये अमर झालेल्या डुरांडलची आख्यायिका त्याच्या जादुई क्षमतांबद्दल भाष्य करते. फ्रेंच साहित्यातील सर्वात जुनी हयात असलेली ही कविता ऑक्सफर्डमधील बोडलियन लायब्ररीमध्ये जतन केलेली आहे. पौराणिक कथेनुसार, राजा शारलेमेनने आपल्या अभिजात नाइट, रोलँडला तलवार दिली. त्याने ती शत्रूच्या हातात पडू नये म्हणून युद्धात त्याच्या मृत्यूपूर्वी ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण ती मोडण्यात त्याला यश आले नाही. त्यामुळे त्याने ती तलवार हवेत उडवली. हवेत उडवलेली ही तलवार रॉकमाडौरच्या दगडी पहाडांमध्ये शेकडो किलोमीटरचा प्रवास करुन मोठ्या दगडात रुतली.

ड्युरंडलच्या तलवारीच्या आठवणीत स्थानिक व्याकूळ

दरम्यान, ड्युरंडल गायब झाल्यामुळे स्थानिक लोक अस्वस्थ झाले आहेत. हे स्थानिक लोक तलवारीला आपल्या वारशाचा अविभाज्य भाग मानतात. "ड्युरंडल नेहमीच आमच्या स्मरणात राहील. तो शतकानुशतके रोकामाडॉरचा भाग आहे, आणि तेथे कोणीही मार्गदर्शक नाही. जो जेव्हा तो भेट देतो तेव्हा त्यास सूचित करत नाही," असे शहराचे महापौर डॉमिनिक लेनफंट यांनी एका फ्रेंच वृत्तपत्राला सांगितले.

पुरातन अवशेष जप्त करण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, खडकावर चढून तलवार काढण्यात कोण यशस्वी ठरले असेल याबाबत पोलिसांमध्येही संभ्रम आहे. एके काळी या पौराणिक आकर्षणासाठी ओळखले जाणारे हे शहर आता त्यांच्या सांस्कृतिक ओळखीसोबत जोडलेले प्रतीक असलेल्या दुरंदलच्या सुरक्षित परतीची आशा करते आहे. या तलवारीचा शोध घेण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now