कझाकिस्तान: फोन उशीखाली ठेवून चार्जिंगला लावल्याने स्फोट, मुलीचा मृत्यू
परंतु स्मार्टफोनसंबंधित अधिक माहिती असल्यास तो खरेदी करावा असे सांगितले जाते. एवढेच नाही यापूर्वी स्मार्टफोन फुटल्याची प्रकरणे सुद्धा समोर आली आहेत.
सध्या बाजारात विविध कंपन्यांचे स्मार्टफोन युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. परंतु स्मार्टफोनसंबंधित अधिक माहिती असल्यास तो खरेदी करावा असे सांगितले जाते. एवढेच नाही यापूर्वी स्मार्टफोन फुटल्याची प्रकरणे सुद्धा समोर आली आहेत. अशाच पद्धतीची एक घटना कझाकिस्तान (Kazakhstan) येथे घडली आहे. फोन उशीखाली ठेवून चार्जिंगला लावल्याने त्याचा अचानक स्फोट झाला. यामध्ये 14 वर्षीय एका मुलीचा मृत्यू झाला आहे.
Alua Asetkyzy Abzalbek असे मुलीचे नाव असून रात्री झोपताना तिने स्मार्टफोन उशिखाली चार्जिंगला लावला आणि गाणी ऐकत होती. मात्र सकाळी तिच्या घरातील अन्य सदस्यांना अलुआ हिचा मृत्यू झालेला दिसून आले. तसेच तिच्या उशिजवळ स्मार्टफोनच्या ब्लास्ट झालेला दिसून आला.
या प्रकरणी तातडीने पोलिसांना अधिक माहिती देण्यात आली. फोन चार्जिंगला लावली असता तेथेच त्याचा स्फोट झाला. त्यामुळे झोपलेल्या अलुआ हिच्या डोक्याला गंभीर दुखापत होत तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. द सन यांनी दिलेल्या एका वृत्तानुसार, फॉरेंसिक एक्सपर्ट यांनी असे म्हटले आहे की स्मार्टफोन अधिक चार्जिंग केला असता त्याला ब्लास्ट झाला. त्यामुळेच अलुआ हिचा मृत्यू झाला आहे. मात्र स्मार्टफोन कोणत्या ब्रॅन्डचा होता याबाबत अद्याप अधिक माहिती देण्यात आलेली नाही.(युजर्सच्या प्रायव्हसीला धोका उद्भवत असल्याने Facebook कडून हजारो App बंद)
यापूर्वी ही स्मार्टफोन चार्जिंगला लावून मेसेज वाचत असताना स्फोट झाल्याची बातमी समोर आली होती. याप्रकरणी सदर मुलाचे दोन्ही पाय भाजले असल्याचे त्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. यामुळे ग्राहकांनी मोबाईल वापरताना काळजी घ्यावी, असे तज्ज्ञ अवाहन करण्यात येते.