Kashmir American Day: न्यूयॉर्क स्टेट असेंब्लीमध्ये 'काश्मीर-अमेरिका दिन' साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता; भारताने व्यक्त केली चिंता

‘न्यूयॉर्कमध्ये मोठ्या संख्येने काश्मिरी विस्थापित आहेत, ज्यांनी त्यांच्या जीवनशैलीत बरीच विविधता दर्शविले आहे. त्यांनी आपली संस्कृती जिवंत ठेवली आहे. काश्मीरचे लोक जगाच्या निरनिराळ्या भागात वास्तव्य करत आहेत

प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

न्यूयॉर्कचे गव्हर्नर Andrew Cuomo यांनी 3 फेब्रुवारी रोजी न्यूयॉर्क राज्य विधानसभेत (New York State Assembly) 5 फेब्रुवारीला काश्मीर-अमेरिका दिन (Kashmir American Day) साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, जो पारित करण्यात आला आहे. हा प्रस्ताव विधानसभेचे सदस्य नादर सईघ (Nader Sayegh) आणि इतर 12 सदस्यांनी तयार केला आहे. या ठरावात असे म्हटले आहे की, 'काश्मिरी समाजाने प्रत्येक अडचणीवर मात केली आहे कार्यक्षमता दर्शविली आहे आणि स्वतःला न्यूयॉर्कच्या स्थलांतरित समुदायांचा आधारस्तंभ म्हणून स्वत: ला स्थापित केले आहे.’ त्यात पुढे म्हटले आहे की, 'न्यूयॉर्क राज्य विविध सांस्कृतिक, वांशिक आणि धार्मिक गरज ओळखून धर्म, चळवळ आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह सर्व काश्मिरी लोकांच्या मानवी हक्कांना समर्थन देण्यासाठी प्रयत्नशील आहे.'

वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाच्या प्रवक्त्याने या प्रस्तावावर भाष्य केले. प्रवक्त्याने सांगितले की, ‘काश्मीर अमेरिकन दिनाबद्दल आम्ही न्यूयॉर्क विधानसभेचा प्रस्ताव पाहिलेला आहे. अमेरिकेप्रमाणेच भारतामध्येही लोकशाही आहे आणि 135 कोटी लोकांची वेगवेगळी विचारधारा व वेगवेगळ्या जगण्याच्या पद्धतीसह लोक इथे राहतात ही अभिमानाची बाब आहे. भारत जम्मू-काश्मीरसह आपली विविधता आणि समृद्ध सांस्कृतिक कल्पना आणि विचारधारा साजरा करतो. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘मात्र, लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील समृद्ध सांस्कृतिक आणि सामाजिक प्रवृत्तीचे चुकीचे वर्णन करणाऱ्या निहित स्वारस्याबाबतच्या प्रयत्नाबद्दल आम्हाला चिंता आहे.’ 5 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानही काश्मीर दिन साजरा करतो. न्यूयॉर्क राज्य विधानसभेत हा ठराव संमत झाल्याने पाकिस्तानला काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर उठविण्यात मदत होईल, असे पाकिस्तानी मुत्सद्दीने एका ट्विटमध्ये म्हटले आहे. पाकिस्तानच्या मुत्सद्दीने फेसबुक पोस्टद्वारे नादर सईघ आणि निक बॅरी यांचे अभिनंदन केले आहे. (हेही वाचा: डेविस सेंन्ट्रल पार्कातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना, Hate Crime चा तपास करण्याची मागणी)

दरम्यान, राज्य विधानसभेने हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर निक पॅरी यांनी सांगितले. ‘न्यूयॉर्कमध्ये मोठ्या संख्येने काश्मिरी विस्थापित आहेत, ज्यांनी त्यांच्या जीवनशैलीत बरीच विविधता दर्शविले आहे. त्यांनी आपली संस्कृती जिवंत ठेवली आहे. काश्मीरचे लोक जगाच्या निरनिराळ्या भागात वास्तव्य करत आहेत आणि आपल्या भाषेसह इस्लाम, हिंदु आणि शीख धर्माचे पालन करतात. काश्मिरींना स्वतःची वेगळी ओळख मिळवून देणे म्हणजे त्यांचे अस्तित्व जिवंत ठेवण्यासरकाहे आहे.’