IPL Auction 2025 Live

Joe Biden Wins US Presidential Election: 'व्हाईट हाऊस' जो बिडेन यांच्या ताब्यात, अमेरिका राष्ट्राध्यक्ष पद निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प पराभूत- रिपोर्ट

दोघांमध्ये रस्सीखेच सुरु होती. मतमोजमीसाठी अवघी काहीच राज्ये बाकी होती. यात पेनसेल्वीनिया (Pennsylvania) हे राज्य कोणाच्या बाजूने उभा राहते यावर बरेच काही अवलंबून होते.

Joe Biden | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिका राष्ट्राध्यक्ष पद निवडणूक 2020 मध्ये अखेर डेमोक्रेट्स (Democratic Party) पक्षाचे उमेदवार जो बिडेन (Joe Biden Wins US Presidential Election) विजयी झाले आहेत. परंपरेप्रमाणे आता अमेरिकेची सर्वोच्च सत्ता असलेले व्हाईट हाऊस जो बिडेन (Joe Biden defeat Donald Trump) यांच्या ताब्यात येणार आहे. जो बाइडेन (Joe Biden) हे युनायडेड स्टेस्ट्सचे 46 वे राष्ट्राध्यक्ष असतील. रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध जो बिडेन हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. अमेरिकेच्या इतिहासातील अपवादात्मक निवाडणुकांपैकी एक अशी ही निवडणूक ठरली. शेवटच्या क्षणापर्यंत काय होणार याबाबत अमेरिकी नागरिक आणि जग श्वास रोखून होते. अखेर निकाल पुढे आला आहे. दरम्यान, जो बिडेन यांच्या विजयाची अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही. परंतू, अमेरिकी प्रसारमाध्यमांनी बिडेन यांच्या विजयाचे वृत्त दिले आहे. सीएनएन, एनबीसी न्यूज आणि सीबीएस न्यूज या माध्यमांनी प्रामुख्याने हे वृत्त दिले आहे.

मतमोजणी दरम्यानचे गेले तीन दिवस अनिश्चिततेचे गेल्यानंतर अखेर जो बिडेन यांनी विजयाच्या दिशेने कूच केली. प्रदीर्घ काळ जो बिनेड 264 तर डोनाल्ड ट्रम्प 214 मतांवर अडकून होते. दोघांमध्ये रस्सीखेच सुरु होती. मतमोजमीसाठी अवघी काहीच राज्ये बाकी होती. यात पेनसेल्वीनिया (Pennsylvania) हे राज्य कोणाच्या बाजूने उभा राहते यावर बरेच काही अवलंबून होते. दरम्यान, बिडेन यांनी बहुमतासाठी आवश्यक असलेली 270 मते (270 Electoral College Votes ) मिळवली आणि त्यांच्या विजयावर शिकामोर्तब झाले. (हेही वाचा, US Election 2020 Results Update: जो बायडेन यांनी चुकीच्या पद्धतीने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर दावा करु नये, Donald Trump यांनी दिला इशारा)

दरम्यान, जो बायडेन हे अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राज्यांमध्ये म्हणजेच जॉर्जिया आणि पेन्सिलवेनिया या ठिकाणांवर आघाडी घेताना दिसत होते. दुसऱ्या बाजूला राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प यांची गाडी मात्र रुळावरुन घसरत असल्याचे चित्र होते. (हेही वाचा, रशियाचे राष्ट्रपती Vladimir Putin पार्किन्सन आजाराने त्रस्त? The Sun च्या रिपोर्टनंतर व्हायरल होणाऱ्या बातमीवर Kremlin कडून खुलासा)

जो बायडेन विजयाच्या दिशेने कूच करत आहेत. तसच, ट्रम्प हे पराभवाच्या छायेत आहेत असे दिसताच ट्रम्प यांच्या कंपेनींग टीमने सांगायलासुरुवात केली होती की, बायडेन यांच्या विजयाला ते न्यायालयात आव्हान देतील. ट्रम्प यांचे कंपेन टीमचे प्रमुख मेट मार्गन यांचे म्हणने असे की, बाईडेन यांनी केलेला विजयाचा दावा अत्यंत खोटारडा आणि दिशाभूल करणारा आहे. मतमोजणी अद्याप पूर्ण झाली नाही. त्यामुळे अमेरिकेची निवडणूक कायदेशीर प्रक्रियेत अडकणार की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.