Joe Biden and Kamala Harris' Inauguration Day: उद्या पार पडेल जो बिडेन आणि कमला हॅरिस यांचा शपथविधी सोहळा; जाणून घ्या काय असेल खास व कुठे पाहाल Live Streaming
जो बिडेन बुधवारी 20 जानेवारी रोजी अमेरिकेच्या 46 व्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतील. बिडेन यांच्यासोबत कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या अश्वेत व महिला उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतील. या वेळचा शपथविधी सोहळा अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये 6 जानेवारी रोजी झालेल्या ट्रम्प समर्थकांच्या हिंसाचारामुळे आणि कोरोना विषाणूच्या साथीमुळे खूप वेगळा असणार आहे
यावेळची अमेरिकेची राष्ट्रपतीपदाची निवडणूक अनेक कारणांनी गाजली. डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांना पायउतार व्हावे लागल्यानंतर देशात जो हिंसाचार उफाळला त्यामुळे अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांची जगात नाचक्की झाली. आता जो बिडेन (Joe Biden) बुधवारी 20 जानेवारी रोजी अमेरिकेच्या 46 व्या राष्ट्रपती पदाची (46th President) शपथ घेतील. बिडेन यांच्यासोबत कमला हॅरिस (Kamala Harris) अमेरिकेच्या पहिल्या अश्वेत व महिला उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतील. या वेळचा शपथविधी सोहळा (Inauguration Day) अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये 6 जानेवारी रोजी झालेल्या ट्रम्प समर्थकांच्या हिंसाचारामुळे आणि कोरोना विषाणूच्या साथीमुळे खूप वेगळा असणार आहे.
सुरक्षेच्या चिंता लक्षात घेता, यावेळी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये 25,000 राष्ट्रीय गार्ड तैनात करण्यात आले आहेत. अमेरिकन इंटेलिजन्स एजन्सी एफबीआयला माहिती मिळाली होती की, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक वॉशिंग्टनच नव्हे तर 50 अमेरिकन राज्यांच्या राजधानीत गदारोळ माजवतील. त्यामुळे व्हाईट हाऊसच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे.
वेळ -
बिडेन आणि कमला हॅरिस यांचा शपथविधी सोहळा अमेरिकेन वेळेनुसार 20 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल, म्हणजेच भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता होईल. त्यानंतर बिडेन लोकांना संबोधित करतील आणि पुढील चार वर्षांसाठीचे आपले व्हिजन मांडतील.
काय असेल खास?
यावर्षी कॅपिटल हिल ते व्हाइट हाऊसपर्यंत सार्वजनिक परेड होणार नाही. त्याऐवजी व्हर्च्युअल परेड आयोजित केली जाईल. शपथविधी सोहळ्यात लेडी गागा राष्ट्रगीत गातील आणि जेनिफर लोपेझ देखील म्युझिकल परफॉर्मन्स देईल. लेडी गागा व्यतिरिक्त जस्टीन टिम्बरलेक, डेमी लोवाटो, गार्थ ब्रूक्स, जॉन लेजेंड यांच्यासह अनेक कलाकार या कार्यक्रमाचा हिस्सा असतील.
कुठे पाहाल?
बिडेन यांचा शपथविधी अमेरिकेतील सर्व टेलिव्हिजन नेटवर्कद्वारे, जसे की CNN, FOX, ABC, NBC प्रसारित केला जाईल. याशिवाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही हा शपथविधीचा कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळेल. व्हाईट हाऊसच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि बिडेन इनॉगरल कमिटीच्या यूट्यूब चॅनलवरही त्याचे थेट प्रक्षेपण होईल. (हेही वाचा: Joe Biden यांनी रचला इतिहास; पहिल्यांदाच अमेरिकन प्रशासनात 20 भारतीय-अमेरिकन लोकांना स्थान)
कोण कोण राहणार उपस्थित?
कोरोना साथीदरम्यान होत असलेल्या या शपथविधी सोहळ्यात सर्व व्हीआयपी, कॅबिनेट सदस्य, खासदार आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित राहू शकतात. अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष माइक पेंस या कार्यक्रमास हजेरी लावतील तर माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच बिडेन यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. अमेरिकेच्या इतिहासातील ही एक अनोखी घटना असेल जेव्हा माजी राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होईल. अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत फक्त तीन राष्ट्रपती जॉन अॅडम्स, जॉन क्विन्सी आणि अॅन्ड्र्यू जॉनसन यांनी सत्ता हस्तांतरणाच्या प्रक्रियेवेळी स्वतःला दूर ठेवले.
(The above story first appeared on LatestLY on Jan 19, 2021 09:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

