UK General Election 2019: जेरेमी कॉर्बीन यांच्याकडून लेबर पार्टीच्या नेतेपदाचा राजीनामा जाहीर
ब्रिटनमध्ये (UK Election 2019) शुक्रवारी सार्वत्रिक निवडणुकींचा निकाला येऊ लागला आहे. या निवडणुकीत लेबर पार्टीला (Labour Party) कमी जागांवर विजय मिळवता आला आहे. यातून लेबर पार्टीचे नेतृत्व करणारे जेरमी कॉर्बीन (Jeremy Corbyn) यांनी पक्षाचा राजीनामा जाहीर केला आहे.
ब्रिटनमध्ये (UK Election 2019) शुक्रवारी सार्वत्रिक निवडणुकींचा निकाला येऊ लागला आहे. या निवडणुकीत लेबर पार्टीला (Labour Party) कमी जागांवर विजय मिळवता आला आहे. यातून लेबर पार्टीचे नेतृत्व करणारे जेरमी कॉर्बीन (Jeremy Corbyn) यांनी पक्षाचा राजीनामा जाहीर केला आहे. सुरुवातीला युकेचे पंतप्रधान बोरीस जॉनसन (Boris Johnson) यांच्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीला 140 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर दुसरीकडे विरोधीपक्ष लेबर पार्टीने 80 जागांवर विजय मिळवला आहे. एक्झिट पोलनुसार, जॉनसन यांचा पक्ष 650 पैंकी 368 जागेवर विजय मिळवून बहुमतांचा आकडा पार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच लेबर पार्टीला केवळ 191 जागेवर विजय मिळवता येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
ब्रेक्झिटच्या मुद्यावरुन ब्रिटेन पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरे गेला. ब्रिटेनमधील 5 वर्षांमधील तिसरी सर्वसाधरण निवडणूक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ब्रेक्झिटच्या मुद्यावरुन ब्रिटेनच्या राजकारण अधिकच तापले आहे. गुरुवारी ब्रिटेनमध्ये 650 जागांसाठी निवडणूक लढवली गेली होती. तसेच यावेळी 3 हजार 322 उमेदवारांना निवडणूक उभे राहण्याची संधी मिळाली होती. वेल्स, स्कॉटलंड, उत्तर आयर्लंड आणि इंग्लंडमधील सर्व ठिकाणी मतदान केंद्रे सकाळी सात वाजता उघण्यात आली होती. रात्री 10 वाजता मतदान संपल्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात झाली होती. या निवडणुकीत 326 पेक्षा अधिक खासदार असलेला पक्ष विजयी ठरणार आहे. आज शुक्रवार सकाळपासून निकालाला सुरुवात झाली आहे. यात बोरीस जॉनसन यांच्या पक्ष विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट चिन्ह दिसत आहे. तर दुसरीकडे लेबर पार्टीने आपला पराभव स्वीकारला असून पक्षाचे नेते जेरमी कॉर्बीन यांनी नेतेपदाचा राजीनामा जाहीर केला आहे. हे देखील वाचा- युगांडा: असा सोडतो वास, पटकण मरतो डास; पादणाऱ्या व्यक्तीशी कंपनीने केला करार, होणार संशोधन
एएनआयचे ट्वीट-
या निवडणुकीत लेबर पक्षाचे नेतृत्व करणारे जेरेमी कॉर्बीन यांनी निकालाबद्दल निराशा व्यक्त केली. पुढील कोणत्याही निवडणुकीत आपण पक्षाचे नेतृत्व करणार नाही, असेही ते म्हणाले. लेबर पार्टीच्या पराभवाला ब्रेग्झिट हे ऐकमेव कारण असल्याचे कॉर्बीन यांनी सांगितले. तसेच सामाजिक न्यायाचा मुद्दा कायम ठेवणार असल्याचेही कॉर्बीन त्यावेळी म्हणाले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)