Jeff Bezos-Lauren Sanchez’s Wedding: ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेझ यांनी इटलीतील व्हेनिस येथे बांधली लग्नगाठ; 200 हून अधिक सेलिब्रिटी आणि उच्चभ्रू व्यक्ती होते उपस्थित

जेफ बेझोस आणि माजी टीव्ही पत्रकार लॉरेन सांचेझ यांनी 27 जून 2025 रोजी, इटलीतील व्हेनिस येथे भव्य समारंभात विवाह केला. या तीन दिवसांच्या थाटामाटाच्या विवाह सोहळ्यासाठी सुमारे 200 हून अधिक सेलिब्रिटी आणि उच्चभ्रू व्यक्ती उपस्थित होत्या.

Jeff Bezos-Lauren Sanchez’s Wedding

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले ॲमेझॉनचे (Amazon) संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) आणि माजी टीव्ही पत्रकार लॉरेन सांचेझ (Lauren Sánchez) यांनी 27 जून 2025 रोजी, इटलीतील व्हेनिस येथे भव्य समारंभात विवाह केला. या तीन दिवसांच्या थाटामाटाच्या विवाह सोहळ्यासाठी सुमारे 200 हून अधिक सेलिब्रिटी आणि उच्चभ्रू व्यक्ती उपस्थित होत्या, ज्यामुळे हा सोहळा व्हेनिसमधील सर्वात चर्चित कार्यक्रम ठरला. या जोडप्याने सॅन जॉर्जियो मॅजिओरे (San Giorgio Maggiore) बेटावरील 16 व्या शतकातील ऐतिहासिक बॅसिलिकामध्ये लग्नगाठ बांधली. याआधी या विवाहाला स्थानिक पातळीवर विरोध झाला होता, कारण काही कार्यकर्त्यांनी व्हेनिसला श्रीमंतांचे खेळाचे मैदान बनवल्याचा आरोप केला. मात्र अखेर काल हा विवाहसोहळा पार पडला.

जेफ बेझोस (वय 61) आणि लॉरेन सांचेझ (वय 55) यांनी 25 जून 2025 रोजी व्हेनिसमध्ये आगमन केले, जिथे त्यांनी अॅमेन हॉटेलमध्ये मुक्काम केला. हे हॉटेल यापूर्वी 2014 मध्ये जॉर्ज आणि अमाल क्लूनी यांच्या विवाहासाठी प्रसिद्ध झाले होते. विवाहाचा मुख्य समारंभ सॅन जॉर्जियो मॅजिओरे बेटावरील बॅसिलिकामध्ये 27 जून रोजी पार पडला, जिथे जोडप्याने औपचारिक समारंभात सहजीवनाची शपथ घेतली. या बेटावरील 16 व्या शतकातील बॅसिलिकाची रचना प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ आंद्रिया पाल्लादियो यांनी केली आहे, ती टिंटोरेटोच्या ‘द लास्ट सपर’ सारख्या कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहे.

Jeff Bezos-Lauren Sanchez’s Wedding: 

विवाहानंतरचा मुख्य स्वागत समारंभ आर्सेनाले येथे आयोजित करण्यात आला, जो मध्ययुगीन काळातील जहाजबांधणीचा एक ऐतिहासिक परिसर आहे. या विवाहासाठी 200 हून अधिक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले होते, ज्यात किम कार्दशियन, ख्लो कार्दशियन, केंडल जेन्नर, कायली जेन्नर, क्रिस जेन्नर, ओप्रा विन्फ्रे, टॉम ब्रॅडी, लिओनार्डो डिकॅप्रियो, इव्हांका ट्रम्प, जारेड कुशनर, बिल गेट्स आणि जॉर्डनच्या राणी राणिया यांचा समावेश होता. यासाठी 90 हून अधिक खासगी विमाने आणि 30 वॉटर टॅक्सी बुक करण्यात आल्या होत्या. व्हेनिसमधील अॅमेन, ग्रिट्टी पॅलेस, बेलमॉन्ड सिप्रियानी आणि हॉटेल डॅनियली यासारख्या पंचतारांकित हॉटेल्समधील खोल्या या सोहळ्यासाठी आरक्षित करण्यात आल्या होत्या.

बेझोस आणि सांचेझ यांनी स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी स्थानिक पुरवठादारांकडून 80% संसाधने घेण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, त्यांनी कोरिला (व्हेनिसच्या लॅगून इकोसिस्टम संशोधन संस्था), यूनेस्को व्हेनिस ऑफिस आणि व्हेनिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी यांना 3 दशलक्ष युरो (सुमारे 27 कोटी रुपये) दान केले. व्हेनिसचे महापौर लुइगी ब्रुन्गारो यांनी या सोहळ्याचे स्वागत केले आणि त्यामुळे शहराला आर्थिक लाभ होईल, असे म्हटले. दरम्यान, बेझोस आणि सांचेझ यांचे नाते 2019 मध्ये सार्वजनिक झाले, आणि मे 2023 मध्ये त्यांनी बेझोस यांच्या 500 दशलक्ष डॉलर्सच्या कोरु यॉटवर साखरपुडा केला. हा दोघांचाही दुसरा विवाह आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement